महत्त्वाच्या बातम्या

जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने एक खिडकी योजना सुरू- जिल्हाधिकारी संतोष पाटील

सातारा: जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने लागणाऱ्या विविध परवान्यांसाठी तालुका व जिल्हास्तरावर एक खिडकी योजना राबविण्यात आली आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी दिली. जिल्हास्तरावरील एक खिडकी कक्ष अग्निशामक केंद्र, हुतात्मा चौक, करंजे नाका, सातारा येथे स्थापन करण्यात आला आहे. यांची नोंद पक्षांनी व उमेदवारांनी घ्यावी, आवश्यक असणाऱ्या विविध निवडणूक विषयक परवान्यांसाठी या ठिकाणी संपर्क साधावा, असेही आवाहन जिल्हाधिकारी  पाटील यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!