महत्त्वाच्या बातम्या

माणदेशात रंगणार ‘शिवराज्याभिषेक’ सोहळ्याचा अभूतपूर्व सोहळा ; २५ आणि २६ एप्रिल रोजी सादरीकरण

​दहिवडी दि .२४:

       माणदेशाच्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारशाला उजाळा देण्यासाठी ‘कथा शिवराज्याभिषेकाची’ या महासोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या दैदिप्यमान शिवराज्याभिषेकाचा सुवर्णक्षण अनुभवण्याची संधी माणदेशातील नागरिकांना मिळणार असून, येत्या २५ आणि २६ एप्रिल रोजी हा भव्य कार्यक्रम दहिवडी व वडूज याठिकाणी रंगणार आहे.

​

       राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) माण तालुक्यातील नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अभयदादा जगताप यांच्या विशेष पुढाकारातून या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे. “आपला इतिहास हाच आपला अभिमान” ही भावना जनमानसात रुजवण्यासाठी आणि नव्या पिढीला इतिहासाचा जिवंत अनुभव देण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे आयोजकांनी सांगितले.

​ हा कार्यक्रम एका भव्य संगीतमय नाटकाच्या स्वरूपात असेल.

​ ‘द किरण माने शो’ तर्फे सादर होणाऱ्या या कार्यक्रमाची निर्मिती ‘एज स्टुडिओ’ने केली आहे.

​ प्रभावी नेपथ्य, प्रकाशयोजना, संगीत आणि कसदार अभिनयाच्या माध्यमातून इतिहास प्रत्यक्ष डोळ्यासमोर जिवंत करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

​

​या उपक्रमामुळे माणदेशातील सांस्कृतिक चळवळीला मोठी चालना मिळणार असून, शिवप्रेमींनी या सोहळ्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!