महत्त्वाच्या बातम्या

कोयना धरणातील पाण्याची आवक थांबली; सांगलीत कृष्णा नदीची पातळी ९ फुटांवर, पुन्हा वाढली चिंता

सांगली:
कोयना पाणलोट क्षेत्रात गेल्या चार दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याचा परिणाम आता धरण आणि नदीच्या पाणीपातळीवर दिसू लागला आहे. धरणात येणाऱ्या पाण्याची आवक पूर्णपणे थांबली असून, सांगलीतील कृष्णा नदीची पाणीपातळीही झपाट्याने घसरून आयर्विन पुलाजवळ ९  फुटांवर आली आहे. त्यामुळे आगामी काळातील पाणीसाठ्याबाबत पुन्हा चिंता व्यक्त केली जात आहे.

८  जुलैपर्यंत झालेल्या मुसळधार पावसामुळे कोयना धरणात सुमारे ४२  टीएमसी पाण्याची भर पडली होती. त्यामुळे धरणातील पाणीसाठा वाढून सध्या तो ५३.६९ टक्क्यांवर पोहोचला आहे. मात्र, हा साठा समाधानकारक नसून धरण पूर्ण क्षमतेने भरणे आवश्यक असल्याचे जाणकारांचे मत आहे.

पावसाने विश्रांती घेतल्यामुळे धरणात नवीन पाण्याची आवक थांबली आहे. दुसरीकडे, कृष्णा नदीतील पाण्याचा प्रवाहही कमी झाल्याने नदीची पातळी वेगाने घटत आहे.

दरम्यान, दुष्काळी भागांना पाणी उपलब्ध करून देण्यासाठी उपसा सिंचन योजनांद्वारे कृष्णा नदीतील पाणी वळविण्यात येत आहे. या योजनांचा काही प्रमाणात लाभ होत असला, तरी उपलब्ध पाणीसाठा लक्षात घेता त्या किती काळ सुरू ठेवता येतील, याबाबत प्रशासन आणि शेतकरी दोघांचेही लक्ष लागले आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!