महत्त्वाच्या बातम्या

पावसाळी अधिवेशन: ‘NDA’ मजबूत, ‘INDIA’ आघाडी अडचणीत

नवी दिल्ली:

संसदेच्या आगामी पावसाळी अधिवेशनापूर्वी देशाच्या राजकीय वर्तुळात अत्यंत वेगवान घडामोडी घडत असून संसदेतील गणिते पूर्णपणे बदलल्याचे पाहायला मिळत आहे. एकीकडे सत्ताधारी भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (NDA) विविध पक्षांतील खासदारांच्या पाठिंब्यामुळे आपले संख्याबळ वाढवून संसदेत स्वतःची पकड मजबूत केली आहे, तर दुसरीकडे विरोधी पक्षांची ‘इंडिया‘ (INDIA) आघाडी अंतर्गत मतभेद, पक्षांतर आणि संभाव्य फुटीच्या मोठ्या आव्हानांना तोंड देत आहे. तृणमूल काँग्रेस (TMC) आणि शिवसेनेच्या (ठाकरे गट) काही खासदारांच्या बदलेल्या भूमिकेमुळे एनडीएचे दोन्ही सभागृहातील बलाबल लक्षणीय वाढले आहे.

यामुळे आगामी काळात मतदारसंघ पुनर्रचना (Delimitation Bill), ‘एक देश, एक निवडणूक‘ आणि इतर महत्त्वाच्या घटनादुरुस्ती विधेयकांना संसदेत मंजुरी मिळवून घेण्यासाठी केंद्र सरकार पूर्ण ताकदीने पुढे जाण्याच्या तयारीत आहे. दुसरीकडे, विरोधकांनीही पावसाळी अधिवेशनात सरकारला कोंडीत पकडण्यासाठी नीट (NEET) परीक्षा घोटाळा, पेपरफुटी प्रकरण, महागाई आणि बेरोजगारी यांसारख्या मुद्द्यांवरून रान उठवण्याची रणनीती आखली आहे. मात्र, बदललेल्या राजकीय समीकरणांमुळे सत्ताधारी एनडीए सध्या संसदेत अत्यंत मजबूत स्थितीत दिसून येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!