महत्त्वाच्या बातम्या

नाशिक,धुळे,नंदुरबार सीमावर्ती भागात 50 कोटींचा मुद्देमाल जप्त 

       महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुकीसाठी आचार संहिता लागू केल्या पासून आत्तापर्यंत 25 दिवसात नाशिक व आजूबाजूच्या परिसरात साडे सहा कोटींची रोकड, पावणे सहा कोटींची अवैध दारू, 52 अग्निशस्त्रे, 39 काडतूसे, 34 कोटी रुपयांचे  दागिने आणि इतर वस्तू असा 49 कोटी 7 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.      

      आचारसंहिते दरम्यान अशी अनेक प्रकरणे समोर आली असून नाकाबंदी आणि गस्ती दरम्यान अहिल्यानगर जिल्ह्यात 23 कोटी 72 लाख रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने जप्त करण्यात आले.नंदुरबार धुळे या सीमावर्ती  भागात तलवारी,चाकू, कोयते जप्त केले तर जळगाव जिल्ह्यात एक कोटी 45 लाख रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली.याची माहिती नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांनी दिली. धुळे जिल्ह्यात गांजाची शेती उध्वस्त करण्यात आली असून नाशिकमध्ये वीस लाख 34 हजारांचा  गांजा वाहतुकी दरम्यान पकडला गेला. गुजरात, मध्यप्रदेश, सीमेवरील धुळे, नाशिक, नंदुरबार या जिल्ह्यांच्या सीमावर्ती  भागात ७२ तपासणी नाके उभारण्यात आले असून या नाक्यावरील तपासात आत्तापर्यंत दोन कोटी दहा लाख रुपये किमतीचा मुद्देमाल व रक्कम जप्त करण्यात आली.

      निवडणुकीच्या पुढील प्रक्रियेसाठी केंद्रीय पोलीस दलाच्या 84 तुकड्या पाच जिल्ह्यात तैनात आहेत. या जिल्ह्यात16891 सराईत गुन्हेगार तसेच उपद्रवी व्यक्तींविरोधात विविध कलमान्वये प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. आत्तापर्यंत 123 जणांना तडीपार केले असून MDPA अंतर्गत 12 सराईत गुन्हेगारांना स्थानबद्धद्ध केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!