जोगेश्वरी विधानसभा मतदारसंघात शिवसेनेच्या ठाकरे व शिंदे गटात जोरदार राडा
जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघात शिवसेनेच्या ठाकरे आणि शिंदे गटामध्ये तणाव वाढला आहे. ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी शिंदे गटाच्या उमेदवारांवर मतदारांना पैसे वाटप केल्याचा आरोप केला आहे.या आरोपामुळे दोन्ही गटातील संघर्षाने आता रौद्ररूप धारण केले आहे. परिणामी मातोश्री क्लब मध्ये दगडफेकीचा प्रकार घडला आहे.जोगेश्वरी पूर्वेकडील मातोश्री क्लब मध्ये शिंदे गटाचे उमेदवार मतदारांना पैसे वाटप करत होते असा आरोप ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. ठाकरे गटाला या सगळ्याची खबर लागताच त्यांनी क्लब मध्ये जाऊन पैसे वाटप थांबवण्याचा प्रयत्न केला तेव्हा आक्रमक प्रतिक्रिया देत शिंदे गटाच्या समर्थकांनी त्यांच्यावर दगडफेक केली. यामध्ये ठाकरे गटाचे उमेदवार बाळा नर यांना देखील मारहाण केली असल्याचा आरोप ठाकरे गटाने केला आहे.
शिंदे गट व ठाकरे गट यांच्यातील संघर्षमय वातावरण वाढले असून ठाकरे घटाने देखील मातोश्री क्लब वर दगडफेक केली. यामुळे परिसरातील वातावरण तापले असून पोलीस बंदोबस्त वाढवला आहे. पैसे वाटपासोबत ड्रायडे असताना मातोश्री क्लब मधील रेस्टॉरंट आणि मध्ये सुमारे 350 जणांचा जमाव असल्याचा आरोप ठाकरे गटाने केला आहे. घटनेच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करून घटनांची सखल चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. शिवसेनेच्या दोन्ही गटाकडून निवडणुकीत जोरदार प्रचार सुरू असून या घटनेचे पडसाद निवडणुकीत उमटतील असे दिसत आहे. याचा नागरिकांच्या मनावर नकारात्मक प्रभाव पडू शकतो. दोन्ही गटाचे कार्यकर्ते पोलिसांच्या रडारवर असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची तयारी सुरू आहे.
