महत्त्वाच्या बातम्या

निवडणुकीच्या तोंडावर आ. महेश शिंदे  गटास खिंडार

      पीरवाडी सातारा येथील युवानेते व सामाजिक कार्यकर्ते मयुर कांबळे यांनी आ. महेश शिंदे गटास रामराम ठोकत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटामध्ये त्यांच्या कार्यकर्त्या सह प्रवेश केला.सदर प्रवेश आ.शशिकांत शिंदे यांच्या उपस्थितीत पीरवाडी येथे पार पडला. यावेळी मयुर कांबळे व त्यांच्या समर्थकांचा आ. शशिकांत शिंदे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन पक्षात स्वागत करण्यात आले.
        या प्रसंगी मयुर कांबळे यांनी सांगितले की आ. महेश शिंदे यांच्या पक्षात प्रामाणिक कार्यकर्त्यांची कदर केली जात नसल्याने  आपण हा निर्णय घेतल्याचे सांगितले. या वेळी आ शशिकांत शिंदे यांनी सांगितले की, नेता हा  कायकर्त्याच्या कष्टावर उभा असतो. तसेच राजकारणात कार्यकर्ते हे पक्षाचा कणा म्हणून काम करत असतात. म्हणून शरद पवार साहेब नेहमी कार्यकत्याचा मान सन्मान ठेवतात. त्यामुळे  मयुर कांबळे व त्यांच्या समर्थकांचा पक्षात योग्य तो सन्मान केला जाईल अशी ग्वाही त्यांनी दिली.
     या वेळी मिलींद कदम ,  सदस्य सुजीत  पवार, कामेश कांबळे, वसिम शेख, विजू नाना उत्तेकर, दत्तानाना उत्तेकर, अमित उत्तेकर, किरणकाका उत्तेकर, लाला मिस्त्री, इस्तियाज मुजावर, जावेद मुजावर, मुज्जमील सय्यद व आरीफ अन्सारी उपस्थित होते.
या पक्ष प्रवेशासाठी युवानेते व उद्योजक कामेश कांबळे यांनी विशेष परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!