महत्त्वाच्या बातम्या

त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त कार्तिक स्वामींच्या मंदिरात भाविकांची दर्शनासाठी गर्दी

 
   कार्तिक महिन्यामध्ये  येणारी पौर्णिमा ही त्रिपुरारी पौर्णिमा म्हणून प्रसिद्ध आहे आणि या पौर्णिमेला धार्मिक महत्व  खूप आहे. यावेळी मंदिरांमध्ये तेलाचे  दिवे प्रज्वलित करून आपल्या इष्ट देवतेची आराधना केली जाते.
तसेच विशेष करून कार्तिक स्वामींच्या मंदिरात मोठ्या प्रमाणात गर्दी होते. कारण हिंदू धर्मामध्ये कार्तिक स्वामीचे दर्शन महिला फक्त याच दिवशी करू शकतात आणि इतर मंदिरांच्या तुलनेत कार्तिक स्वामींची  मंदिरे खूप दुर्मिळ असल्याने या मंदिरामध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होताना दिसून येते.
सातारा जिल्ह्यामध्ये खटाव तालुक्यातील अंभेरी येथे कार्तिक स्वामींचे मंदिर असून दुसरे मंदिर सातारा येथील कृष्णा नदीकाठी आहे. तर तिसरे मंदिर सौ. वेदांतिकाराजे भोसले यांच्या छत्रपती शाहू ॲकॅडमीच्या प्रांगणात आहे. काल रात्री शाहू अकॅडमी जवळील मंदिरात भाविकांनी रात्री 10 नंतर मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. कार्तिक स्वामींचे वाहन मोर असल्याने कार्तिक स्वामींचे दर्शन घेताना मोरपीस वाहण्याची परंपरा आहे. या वेळी संपूर्ण परिसर दिव्याच्या प्रकाशात न्हावून निघाला होता. शाहू ॲकॅडमीच्या  कर्मचाऱ्यांनी दर्शन सुरळीत होण्यासाठी नियोजनबद्ध व्यवस्था केली होती. यावेळी दर्शन घेण्यासाठी जिल्ह्या बाहेरील  भाविकांनी सुद्धा मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती.IMG-20241116-WA0010

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!