भाजपा महायुतीचे उमेदवार मनोज दादा घोरपडे यांच्या प्रचारार्थ विरोधकांवर दोन्ही महाराजांची तोफ धडाडली.
नागठाणे येथे भाजपा महायुतीचे उमेदवार मनोज दादा घोरपडे यांच्या प्रचारार्थ दोन्ही महाराजांच्या उपस्थितीत प्रचार सभा पार पडली. प्रचार सभेमध्ये दोन्ही महाराजांनी भाजपा महायुतीच्या जाहीरनाम्याचे वाचन केले व नागठाणे येथील सभेत दोन्ही महाराजांनी विरोधकांवर टीकास्त्र सोडले. भाजपा महायुतीचे सातारा जिल्हाध्यक्ष धैर्यशील दादा कदम व भाजपा सातारा जिल्हा किसान मोर्चाच्या आघाडीचे रामकृष्ण वेताळ साहेब यांनी नागठाणे येथील सभेत जाहीर पाठिंबा दिला.
सातारा जिल्ह्याचे खासदार मा.छत्रपती उदयनराजे भोसले, भाजपा महायुतीचे सातारा जावली मतदार संघाचे उमेदवार शिवेंद्रसिंहराजे भोसले, भाजपा सातारा समन्वयक सुनील तात्या काटकर,भाजपा किसान मोर्चाच्या अध्यक्ष रामकृष्ण वेताळ,भाजपा सातारा जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम दादा, मार्गदर्शिका व सातारा स्वाभिमानी सखी मंचाच्या अध्यक्षा समताताई घोरपडे यांनी महायुतीचे उमेदवार मनोज दादा घोरपडे यांना मतदान करून निवडून आणा असे लोकांना आव्हान केले. नागठाणे येथील सभेत भाजपा रहिमतपूर मंडल उपध्याक्ष पृथ्वीराज निकम,भाजपा रहिमतपूर मंडल महिला उपाध्यक्षा सारिका निकम व भाजपा अपशिंगे गावचे बुथ क्रमांक ४५ चे बुथ अध्यक्ष समीर निकम उपस्थित होते.
