महत्त्वाच्या बातम्या

राजेंद्र विद्यालय खंडाळा च्या खोखो संघाने अजिंक्यपद पटकवून रचला नवा इतिहास 

      रत्नागिरी जिल्ह्यातील डेरवण येथे राज्यस्तरीय खो खो स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत सातारा जिल्ह्यातील राजेंद्र विद्यालय, खंडाळा खो- खो संघाने १४ वर्षाखालील खो- खो स्पर्धेत अंतिम सामन्यात धाराशिव या संघावर मात करून अजिंक्यपद पटकावले व इतिहास घडवला. सर्व सहभागी खेळाडू व महाराष्ट्र संघात निवड झालेले स्वराज उत्तेकर, वरद पोळ, प्रतिक खंडागळे, स्वराज गाढवे यांचा खंडाळा विभाग शिक्षण समिती संस्थापक अध्यक्ष शंकरराव गाढवे, सचिव अनिरुद्ध(संजीव) गाढवे, प्राचार्य शब्बीर नालबंद, संचालक वसंतराव पंडित, संचालिका तथा उपप्राचार्य अरुंधती गाढवे व मान्यवरांच्या उपस्थितीत विद्यार्थी व क्रीडा शिक्षक व्ही एन गाढवे, वसंत राऊत,प्रशिक्षक डीजी गाढवे, महेंद्रकुमार गाढवे, दिग्विजय खंडागळे यांचा विशेष सन्मान करण्यात आला.

     यावेळी सुशिला शंकरराव गाढवे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ हणमंत जाधव, कार्यालय अधीक्षक संतोष गाढवे,  ग्रंथपाल हणमंत यादव, सर्व प्राध्यापक वृंद यांच्याकडून खेळाडूंना राष्ट्रीय व राज्य स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!