महत्त्वाच्या बातम्या

महाराष्ट्राचे मा.गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या गाडीवर दगडफेक….हल्ल्यात देशमुख रक्त बंबाळ 

      निवडणुकीच्या प्रचाराच्या अखेरच्या दिवशी नागपूर येथे एक धक्कादायक प्रकार घडला. महाराष्ट्राचे मा. गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली.  त्यांचा मुलगा सलील देशमुख हा कटोल विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडून भाजपच्या चरण सिंग ठाकूर यांच्या विरोधात निवडणूक लढवत आहेत. देशमुख हे मुलाचा नरखेड येथील प्रचार आटोपून परत येत होते. तेव्हा त्यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली. यात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून अनिल देशमुखांना नागपूर येथील ॲलेक्सिस हॉस्पिटल मध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. 

     प्रचार सभा आटोपून परतताना झालेल्या या हल्ल्यात गाडीच्या खिडकीच्या काचांचा चक्काचूर झाला आहे. या हल्ल्यामुळे कटोल मधील वातावरण तणावपूर्ण झाले आहे. त्यांच्या कार्यकर्त्यांनी पोलीस स्टेशन मध्ये गर्दी केली असून हल्लेखोरांना लवकर अटक करा अशी मागणी केली आहे. हल्लेखोरांचा तपास सुरु असून लवकरात लवकर त्यांच्या विरोधात कारवाई केली जाईल असे नागपूर पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!