महत्त्वाच्या बातम्या

वेब कास्टिंग द्वारे नागपूर निवडणुकीसाठी सज्ज….विपीन इटनकर, जिल्हाधिकारी नागपूर

   विधानसभा निवडणूकीसाठी सर्व उमेदवार सज्ज झाले आहेत. काल रात्री प्रचाराची समाप्ती झाली असून उद्या दि 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. मतदान सुरळीतपणे पार पाडण्यासाठी राज्यात विविध पद्धतीने काम सुरु आहे. नागपूर शहरातील प्रत्येक मतदान केंद्र हे वेब कास्टिंग द्वारे जिल्हाधिकाऱ्यांच्या नजरेखाली राहील अशी माहिती नागपूरचे जिल्हाधिकारी विपीन इटनकर यांनी दिली.
        मतदात्यांना कोणत्याही त्रासाला समोरे जाऊ लागू नये यासाठी ही तयारी करण्यात आली आहे. नागपूर मधील 4631 पोलीस स्टेशन कार्यरत असतील त्यामधील 3500 पोलीस स्टेशन वेब कास्टिंग द्वारे कव्हर केले आहेत व ग्रामीण भागातील 50 टक्के मतदान केंद्रांवर कॅमेरे लावण्यात आले आहेत. मतदान बूथ वर आत आणि बाहेर असे 2 कॅमेरे लावले असून मतदान प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडण्यासाठी व मतदान केंद्रावर कोणताही गैर प्रकार होऊ नये यासाठी ही खबरदारी घेण्यात आली आहे. 
   विपीन इटनकर म्हणाले की, या वेब कास्टिंग कव्हरेज द्वारे मतदान केंद्रावर पोलीस यंत्रणा सज्ज आहे का, लाईन किती आहे, मोबाईल अथवा अन्य साहित्य सोबत बाळगले आहे का  याची माहिती चित्रीकरणाद्वारे मिळेल. तसेच इव्हीएम ची हाताळणी करणाऱ्या अधिकाऱ्यांवर नजर ठेवण्यासाठी चक्रिका ॲप डाऊनलोड करण्यात आले आहे.निवडणुक प्रक्रियेत पारदर्शकता राहण्यासाठी या सर्व गोष्टींचा वापर केला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!