महत्त्वाच्या बातम्या

बीड मधुन निवडणूक लढवणाऱ्या उमेदवाराचा मतदान केंद्रावर मृत्यू

     आज राजभरात विधानसभा निवडणुका पार पडल्या. सकाळी सात ते संध्याकाळी वाजेपर्यंत ही  प्रक्रिया सुरू होती. यातच  बीडमधून अत्यंत दुःखद बाब समोर आली आहे. बीड मतदार संघातून निवडणूक लढवणाऱ्या उमेदवाराचा मतदान केंद्रावर मृत्यू झाला आहे. बाळासाहेब नारायण शिंदे असे उमेदवाराचे नाव आहे .बीडमधून निवडणूक लढवणारे अपक्ष उमेदवार बाळासाहेब शिंदे यांच्या तब्बेतीत अचानक बिघाड  झाला.  ते मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर पोहोचले होते. रांगेत उभे असताना  त्यांना हृदयविकाराचा झटका आला.

बीडमध्ये छत्रपती शाहू विद्यालयाच्या मतदान केंद्रावरती ते मतदानासाठी गेले होते. तब्येतीत बिघाड  झाल्याने त्यांना ताबडतोब काकू नाना  रुग्णालयात नेण्यात आले.व  नंतर छत्रपती संभाजीनगर रुग्णालयात नेले असता त्यांना मृत घोषित करण्यात आले. या घटने नंतर मतदान केंद्रावर गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. 
     लोकप्रतिनिधी कायदा 1951 नुसार, निवडणुकीदरम्यान उमेदवाराचा मृत्यू झाल्यास कलम 52 अंतर्गत संबंधित जागांसाठी निवडणूका पुढे ढकलल्या जाऊ शकतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!