एक्झिट पोलच्या आकडेवारीनुसार भाजप ठरणार सर्वात मोठा पक्ष तर काँग्रेस दुसऱ्या क्रमांकावर
राज्यातील विधानसभा निवडणूकीसाठी आज मतदान प्रक्रिया राबवण्यात आली होती. राज्यातील 288 जागांसाठी मतदान झाले असून 5 वाजे पर्यंत सरासरी 58.22% मतदान झाले. त्यासंबंधी पुढील आकडेवारी समोर येत आहे. यात भाजप सर्वात मोठा पक्ष ठरणार असल्याचे चित्र दिसत आहे.कॉंग्रेस दुसऱ्या क्रमांकावर असेल असा अंदाज आहे. भाजपच्या मागील मतदानाच्या तुलनेत या वेळेच्या मतदाना मध्ये घसरण होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. राज्यात महायुतीला 152 ते 160 जागा तर मविआ ला 126 ते 130 जागा मिळण्याची शक्यता आहे.
भाजपला या मध्ये 78 ते 108 जागा मिळतील काँग्रेस दुसऱ्या क्रमांकावर असून 28 ते 63 जागा मिळण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी अजितपावर गटाला 14 ते 26 व शिवसेना ठाकरे गटाला 21 ते 44 जागा मिळतील असा अंदाज एक्झिट पोल मध्ये देण्यात आला. अजितपावर गटाला व ठाकरे गटाला सर्वात कमी जागा मिळतील असे दिसत आहे.
