तुळजाभवानी देवीच्या सिंहासन पूजेसाठी ऑनलाईन बुकिंग सुरू
श्री तुळजाभवानी देवीचे मंदिर हे महाराष्ट्रातील तुळजापूर येथील एक हिंदू मंदिर आहे. तुळजाभवानी देवी महाराष्ट्राची कुलस्वामिनी म्हणून ओळखली जाते. महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी श्री तुळजाभवानी देवीचे तुळजापूर क्षेत्र हे एक पूर्णशक्तिपीठ आहे. ही देवी भगवती (भवानी) म्हणून प्रसिद्ध आहे. देविची मूर्ती ही चल मूर्ती आहे. तुळजाभवानी मंदिराच्या काही भागाची धाटनी ही हेमाडपंती आहे. हे शहर बालाघाटच्या एका कड्यावर वसले आहे. इतिहास व पुरातत्त्वदृष्टया हे मंदिर राष्ट्रकूट अथवा यादवकालीन मानले जाते.
देवीच्या दर्शनासाठी महाराष्ट्रसह आंध्र प्रदेश कर्नाटक तेलंगणा व इतर राज्यातून अनेक भाविक या ठिकाणी कुलाचार आणि कुलधर्म करण्यासाठी मोठ्या संख्येने येत असतात. या ठिकाणी देवीची सिंहासन पूजा ही अत्यंत महत्त्वाची पूजा मानली जाते. सिंहासन पूजेची नोंदणी ऑनलाइन पद्धतीने तुळजाभवानी मंदिर संस्थानाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आली आहे. आजपासून सिंहासन पूजा नोंदणी सकाळी दहा वाजल्यापासून सुरू झाली आहे. तर 26 नोव्हेंबर रोजी सकाळी दहा वाजेपर्यंत ही पूजा करण्यात येणार आहे. तरी सर्व भक्तांनी व भाविकांनी यामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.
