महत्त्वाच्या बातम्या

सातारा बस डेपो मधून सातारा ते अयोध्या बस रवाना

     सातारा विभागाची सातारा ते अयोध्या ही बस आज सकाळी भावपूर्ण वातावरणात अयोध्येस रवाना झाली.
या बसमधून 27 महिला व 28 पुरुष प्रवास करत असून या बसचे सारथ्य सातारा आगाराचे चालक अजित काटे व शैलेश खोत हे करत आहेत. यांना 15 वर्ष सेवेचा प्रदीर्घ अनुभव आहे.सदर बस सातारा-मोरगाव-शेगाव-मध्यप्रदेश मार्गे जाणार असून हा प्रवास चार हजार किलोमीटरचा आहे.  या प्रवासासाठी राज्य परिवहन महामंडळाने रुपये साडेसात हजार असे शुल्क ठेवले आहे. यामध्ये निवासस्थान व भोजन व्यवस्थापन याची व्यवस्था महामंडळाने  केली असून त्याचे शुल्क प्रवाशांनी भरावयाचे आहे.

      ही बस बुधवारी पहाटे अयोध्येस पोहचणार आहे. व गुरुवारी संध्याकाळी परतीसाठी रवाना होणार आहे.
सर्व बसचे पूजन सातारा विभागाच्या अधिकारी वर्ग व तसेच बस मधील प्रवाशांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी वाहतूक  महाव्यवस्थापक वीरेंद्र कदम, विभाग नियंत्रक रोहन पलंगे, विभागीय वाहतूक अधिकारी सौ. ज्योती गायकवाड, विभागीय यंत्र अभियंता सौ. रेशमा गाडेकर, वाहतूक निरीक्षक विकास माने, राहुल शिंगाडे, रोहीत डीगे, सागर मतकर, वसीम पठाण तसेच आगार व्यवस्थापक रमाकांत शिंदे व युवराज कदम उपस्थित होते. यावेळी बोलताना विभागीय वाहतूक अधिकारी सौ. ज्योती गायकवाड यांनी सांगितले की, सातारा आगाराची हिरकणीबस MH 14 KA 6735 ही नवीन बस रवाना करण्यात आली असून प्रत्येक महिन्याला एक बस पाठवण्याचे नियोजन आहे.

      सातारा आगाराने प्रथमच हे आयोजन केले असून प्रवाशांचा यासाठी उत्स्फूर्त    प्रतिसाद आहे.  या साठी आमच्या सर्व अधिकारी व कर्मचारी वर्गाने परिश्रम घेतले आहेत.यावेळी संपूर्ण परिसर जय श्रीराम घोषणेने दणाणून गेला होता. त्याचबरोबर अयोध्येस जाणारे प्रवासी व त्यांच्या सहकाऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता.IMG-20241125-WA0034

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!