महत्त्वाच्या बातम्या

महायुतीची मुंबईतील बैठक रद्द…एकनाथ शिंदे जाणार साताऱ्याला

      निवडणुकीचा निकाल लागल्यानांतर आता सत्ता स्थापनेसाठी महायुतीच्या बैठकांना उधाण आले आहे. काल केंद्रीयमंत्री अमितशाह यांच्या निवास स्थानी महायुतीच्या नेत्यांची बैठक झाली.यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,  अजित पवार, देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. सरकार स्थापने संदर्भात शाह यांनी सूचना दिल्या होत्या. आज मुंबईत महायुतीची बैठक होणार होती ती अचानक रद्द झाली आहे.

      राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे साताऱ्यातील दरे या आपल्या गावी येणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे मुंबईत देवेंद्र फडणवीस,  अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांची होणारी बैठक रद्द झाली.आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण होणार? याकडे सर्वांचे लक्ष आहे. महायुतीच्या सरकार मध्ये सत्ता स्थापनेसाठी होत असलेल्या बैठकीत वाटाघाटी सुरूच आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!