महत्त्वाच्या बातम्या

मुख्यमंत्री कृषी वाहिनी योजना 2.0 अंतर्गत  बिजवडी सौर ऊर्जा प्रकल्प ठरला साताऱ्यातील पहिला सौर ऊर्जा प्रकल्प

     सातारा जिल्ह्यात माण तालुक्यातील बिजवडी येथे पहिला सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वीत करण्यात आला आहे . हा प्रकल्प मुख्यमंत्री कृषिवाहिनी योजना 2.0 अंतर्गत असणारा पहिलाच प्रकल्प आहे.दि 28 नोव्हेंबर रोजी महाविरणाचे पुणे प्रादेशिक संचालक भुजंग खंदारे व बारामतीचे मुख्य अभियंता अंकुश नाळे  यांच्या हस्ते या सौर ऊर्जा प्रकल्पाचा शुभारंभ करण्यात आला. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजने अंतर्गत सुरु झालेला हा प्रकल्प 5 मेगा वॅट चा आहे. यामुळे बिजवडी गावातील 33/11 केव्ही उपकेंद्रांतर्गत 8 गावातील सुमारे 1427 शेतीच्या पंपांना दिवसा विज पुरवठा होणार आहे.
         राज्याचे तत्कालीन उपमुख्यमंत्री व उर्जा मंत्री  देवेंद्र फडणवीस यांनी महाविरणाच्या माध्यमातून ‘मुखमंत्री सौर कृषी वाहिनी 2.0’  ही योजना जाहीर केली होती. या योजने अंतर्गत सातारा जिल्ह्यात सुमारे 208 मेगावॅट  क्षमतेचे विकेंद्रित सौर ऊर्जा प्रकल्प होणार आहेत. त्यापैकी माण तालुक्यातील बिजवडी हा पहिला प्रकल्प ठरला आहे. यामध्ये राजवाडी, येळेवाडी, मोगराळे, पाचवड,हस्तनपुर, थदाळे ,अनभूलेवाडी आणि बिजवडी या गावांचा समावेश आहे.

     या प्रकल्पाचे कॉन्ट्रॅक्ट मे.मेघा इंजिनिअरिंग कंपनी ला मिळाले असून त्यांनी 25 एकर गायरान जमिनीवर प्रकल्प साकारण्याचे काम केले आहे.प्रकल्पच्या शुभारंभावेळी मेघा इंजिनिअरिंग चे सुरेश शेट्टी,अधीक्षक अभियंता बाळासाहेब हळनोर, कार्यकारी अभियंते सागर मारुळकर, हनुमंत ढोक व प्रमोद रागीट उपस्थित होते. शासनाच्या    पडीक गायरान जमिनीवर 3 ते 10 मेगा वट चे विकेंद्रित सौर प्रकल्प निर्माण करुन तयार झालेली विज नजिकच्या 33 केव्ही उपकेंद्राला जोडणे व ती विज दिवसा शेतकऱ्यांना देणे असे या योजनेचे स्वरुप आहे.हा प्रकल्प सातारा जिल्ह्यातील व बारामती परिमंडलातील पहिला प्रकल्प ठरला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!