महत्त्वाच्या बातम्या

जावळीत परसबाग स्पर्धेत डेरेवाडी शाळा प्रथम व जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड….सायगाव द्वितीय,रेंगडीवाडी तृतीय

      प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत जावळी    तालुक्यातील प्राथमिक शाळामध्ये निर्माण करण्यात आलेल्या परसबागांचे नुकतेच तज्ञ कमिटीकडून परीक्षण करण्यात आले.यामध्ये डेरेवाडी प्राथमिक शाळेने तालुक्यात प्रथम येत जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी शाळेची निवड झाली आहे.या स्पर्धेत सायगाव शाळेने द्वितीय तर रेंगडीवाडी शाळेने तृतीय क्रमांक पटकावला आहे.
    आपल्या परसबागेत शाळेने कोबी, फ्लॉवर, सिमला मिरची, वांगी,टोमॅटो, मिरची,कांदा,बीट,मुळा,पावटा, भेंडी, दोडका,भोपळा,काकडी,कारले,शेवगा आदींच्या रोपांची लागवड केली आहे. तसेच तुळस, गवती चहा, कोरफड, अडुळसा, कडीपत्ता या औषधी वनस्पतींचाही यामध्ये समावेश केलेला आहे.याशिवाय  मायक्रोग्रीन पद्धतीचा वापर केला असून सिंचनाच्या आधुनिक पद्धतींचा अवलंब केलेला आहे.  विद्यार्थ्यांच्या मदतीने गांडूळ सेंद्रिय खत, जीवामृत, गांडूळखत दशपर्णी अर्क तयार केले आहे.याचा  वापर परसबागेसाठी उपयोग केला जातो.असून मुख्याध्यापक विजय शिर्के,सहकारी सुनीता जुनघरे ग्रामस्थ, पालक यांच्या सहकार्याने पूर्णपणे सेंद्रिय पद्धतीची  बाग फुलवली असून विद्यार्थ्यांकरिता  परसबागेची देखभाल करण्याचे योग्य नियोजनही  करण्यात आले आहे. 
       परसबागेची रचना,आराखडा, हवामान परिस्थितीनुसार भाज्यांची लागवड ,परसबागेचे व्यवस्थापन , विद्यार्थी पालक शिक्षकांचा सहभाग , उत्पादित भाजीपाल्यांचा आहारामधील समावेश व परसबागेतील भाज्यांची विक्री या आधारे तालुकास्तरावर या  परसबागेचे परीक्षण करण्यात आले. यामध्ये डेरेवाडी,सायगाव, रेंगडीवाडी शाळा यशस्वी ठरल्या असून निझरे, म्हसवेमाची,महू यांची प्रोत्साहनपर म्हणून निवड  करण्यात आली आहे.
       या यशाबद्दल गटशिक्षणाधिकारी संजय धुमाळ,शिक्षण विस्तारअधिकारी अरविंद दळवी,चंद्रकांत कर्णे , केंद्रप्रमुख  हंबीरराव जगताप , शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष , ग्रामस्थ आदींनी अभिनंदन केले. 
 
विद्यार्थ्यांच्या  पोषणासाठी पौष्टिक घटक मिळायला हवेत. याकरिता परसबाग विकसित केल्यामुळे विद्यार्थ्यांनी पिकवलेल्या ताज्या भाज्या खाण्यास मिळनार आहेत .  या वयात त्यांना चांगला उपयुक्त आहार घेण्याची सवय लागेल.या हेतूनेच या परसबागेची निर्मिती करण्यात आली आहे.  यातून विद्यार्थ्यांमध्ये श्रमप्रतिष्ठा या मूल्याची जोपासना मदत होणार आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!