महत्त्वाच्या बातम्या

आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी जावळीकरांचे मानले आभार

      सर्व सामान्य जनतेच्या सुख दुःखात कायमच मी सोबत असल्याने व जावळी तालुक्यात कोणतेही गट तट न करता केलेली विकास कामाची पोच पावती नव्हे तर अख्ख पावती पुस्तक मला जावळीकरांनी भरघोस मताच्या माध्यमातून दिले आहे. त्यांचे ऋण मी कधीही विसरू शकणार नाही,असे प्रतिपादन आ शिवेंद्रसिहराजे भोसले यांनी केले.
       खर्शी तर्फे कुडाळ ता.जावळी येथील पोलीस पाटील सुहास भोसले यांच्या आईच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त घेण्यात आलेल्या कार्यक्रमावेळी ते बोलत होते, यावेळी प्रसिद्ध कीर्तनकार हभप शिवलीलाताई पाटील,जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष वसंतराव मानकुंभरे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक जयदीप शिंदे,धनंजय केंजळे,मच्छिन्द्र मुळीक,शिक्षक बँकेचे संचालक विजय शिर्के,विजय पवार,नितिन मोहिते,जावळी तालुका पत्रकार संघ अध्यक्ष प्रशांत गुजर, सचिव धनंजय गोरे,शशिकांत गुरव,बजरंग चौधरी, सुनील धनावडे,अभिजित दुदुस्कर, मुन्ना मुसळे,समीर आतार, नीलेश गायकवाड, समाधान गायकवाड, लक्ष्मण भोसले यांची प्रमुख उपस्थिती होती.
  यावेळी पुढे बोलताना आ भोसले म्हणाले, काम झालं की मी सोडून देणाऱ्या पैकी नाहीये त्यामुळे माझ्यासाठी खऱ्या अर्थाने काम केलेल्या कोणत्याही कार्यकर्त्यांना मी वाऱ्यावर सोडणार, काहीही काम असले की मला थेट येऊन सांगा, असे आव्हान देखील यावेळी त्यांनी केले.
    यावेळी आ भोसले यांचा विजयी सन्मान खर्शी तर्फे कुडाळ ग्रामस्थांच्या वतीने व खर्शी गावच्या माजी सरपंच सौ स्मिता भोसले, वंदना भोसले, सचिन भोसले, मंगल शिंगटे, दिलीप भोसले,राजेंद्र भोसले,पोलीस पाटील सुहास भोसले,यांच्यावतीने आ भोसले यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी खर्शीचे सरपंच,सोसायटी अध्यक्ष,श्री सिद्धनाथ, श्री रामवरदायनी मंडळाचे कार्यकर्ते, पंचक्रोशीतील ग्रामस्थ, महिला, व भजनी मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष पालवे यांनी तर आभार संदीप किर्वे व धैर्यशील भोसले यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!