महत्त्वाच्या बातम्या

पुण्यात १९ पदांसाठी भरती; प्राध्यापकांसह विविध पदांसाठी अर्ज करण्याची संधी

पुणे : यांच्या वतीने विविध पदांच्या भरतीसाठी अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेत प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक तसेच प्रशिक्षण व नियुक्ती अधिकारी या पदांचा समावेश आहे. पात्र उमेदवारां कडून ई-मेलद्वारे अर्ज मागविण्यात आले आहेत.

या भरतीमध्ये प्राध्यापक पदासाठी ४, सहयोगी प्राध्यापक पदासाठी ८, सहाय्यक प्राध्यापक पदासाठी १६ आणि प्रशिक्षण व नियुक्ती अधिकारी पदासाठी १ अशा एकूण १९ रिक्त जागा असल्याचे जाहिरातीत नमूद करण्यात आले आहे. या पदांसाठी नोकरीचे ठिकाण पुणे, महाराष्ट्र असे आहे.

पदनिहाय रिक्त जागा

  • प्राध्यापक – ४ पदे
  • सहयोगी प्राध्यापक – ८ पदे
  • सहाय्यक प्राध्यापक – १६ पदे
  • प्रशिक्षण व नियुक्ती अधिकारी – १ पद

शैक्षणिक पात्रता

संबंधित पदासाठी उमेदवाराकडे जाहिरातीत नमूद केल्यानुसार पदव्युत्तर पदवी/पीएच.डी. आणि पदाशी संबंधित आवश्यक शैक्षणिक पात्रता असणे आवश्यक आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी संबंधित पदाच्या सविस्तर पात्रता निकषांची पडताळणी करणे आवश्यक आहे.

अर्ज कसा कराल?

या भरतीसाठी उमेदवारांना ई-मेलद्वारे अर्ज करायचा आहे. इच्छुक उमेदवारांनी आवश्यक तपशीलांसह दिलेल्या नमुन्यातील बायोडाटा तयार करून iims.info@yashaswigroup.in या ई-मेलवर पाठवावा. अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे, छायाचित्र व स्वाक्षरीची प्रत जोडणे आवश्यक आहे.

अर्जाची अंतिम तारीख

२३ सप्टेंबर २०२६ ही अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे. त्यामुळे इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अंतिम मुदती पूर्वी अर्ज साद करावा.

महत्त्वाचे : पदांची संख्या, शैक्षणिक पात्रता, अर्जाची पद्धत आणि इतर अटी संस्थेच्या अधिकृत भरती जाहिराती नुसार तपासूनच अर्ज करावा.

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!