महत्त्वाच्या बातम्या

पाडेगाव येथे महाराष्ट्र शासनाच्या राखीव खाण क्षेत्रात अतिक्रमण करून अंधश्रद्धेचा प्रसार

      सातारा जिल्ह्यातील पाडेगाव ता. खंडाळा येथे गेले काही वर्षांपासून जादूटोणा करून अंधश्रद्धा पसरवण्याचे काम सुरु आहे.महाराष्ट्र राज्य राखीव खाण  क्षेत्रात भोंदू, तांत्रिक बुवा श्री विठ्ठल गायकवाड, दत्तात्रय गायकवाड, भागुबाई गायकवाड यांनी राजकीय पुढाऱ्यांच्या मार्फत शासनाच्या मोक्याच्या क्षेत्रावर बेकायदेशीर अतिक्रमण केले आहे. राखीव खाण क्षेत्रातील महाराष्ट्र शासनाच्या 5 एकर पैकी किमान 1 एकर क्षेत्रावर विनापरवाना अतिक्रमण करून बेकायदेशीर ताबा मिळवण्यासाठी मंदिर बांधण्याचे काम सुरु आहे. त्याठिकाणी जादूटोणा क्रिया करून सर्व  सामान्य लोकांना लुबाडण्याचे काम गेले अनेक वर्ष चालू आहे.

    बेकायदेशीररित्या  शासनाच्या राखीव खाण क्षेत्राचा वापर करून मोठ्या प्रमाणात अंधश्रद्धेचा प्रसार केला जात आहे.ही निंदनीय बाब आहे.सदर जादूटोणा करणाऱ्या दत्तात्रय गायकवाड, भागुबाई गायकवाड व विठ्ठल गायकवाड यांच्यावर जादूटोणा विरोधी कायदा अधिनियम 2013 कलम 3(२) अन्वये गुन्हा दाखल केला असून ते जामिनावर बाहेर आहेत. वास्तविक पाहता अशा जादूटोणा आणि अंधश्रद्धेचा प्रसार करून बहुजन समाजाला लुबाडणाऱ्या व्यक्तिकडून महाराष्ट्र शासनाच्या राखीव खाण क्षेत्राचा पुरेपूररित्या गैरवापर होत असून ही गंभीर बाब आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!