मुंबईतील पाटण वासियांचा सत्यजित पाटणकर यांच्या उपस्थितीत आभार दौरा संपन्न
राज्याची विधानसभा निवडणुक पार पडल्या नंतर सर्व मतदारांचे आभार मानण्यासाठी मुंबईत आभार दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. पाटण विधानसभा मतदारसंघातील मुंबई,नवी मुंबई व ठाणे परिसरात रहिवासी असलेल्या मतदार बंधू भगिनी यांना भेटण्यासाठी आभार दौऱ्यानिमित्त आदरणीय नेते मा.श्री.सत्यजितसिंह पाटणकर (दादा) संचालक, सातारा (जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक) यांचा आभार दौरा मंगळवार दिनांक 10 डिसेंबर रोजी पार पडला.
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत मोलाचं सहकार्य करणाऱ्या मुंबई, नवी मुंबई, ठाणे व आसपासच्या परिसरात स्थायिक असणाऱ्या पाटणवासीय मतदार, पदाधिकारी, कार्यकर्ते व हितचिंतकांचा आभार मेळावा मुंबई येथे पार पडला. यावेळी सत्यजित पाटणकर दादा उपस्थित राहून सर्वांचे आभार मानले. जय-पराजय हा प्रत्येक निवडणूकीचा भाग असतो. पराभवाने खचून न जाता आत्तापासूनच जोमाने कामाला सुरुवात करण्याचा निर्धार यावेळी सर्वांनी केला. तसेच मुंबई कोअर कमिटीचे दादांनी अभिनंदन केले .
यावेळी मा श्री.पोपटराव कदम (नाना) श्री.अमर पवार, श्री.विजय बेबले, श्री.शंकर माने, श्री.योगशे पाटणकर, श्री.संदीप सुर्वे, श्री.सुरेश भोळे, श्री.शकर बोरगे, श्री.राम सावंत, श्री प्रदीप जाधव, व तालुक्यातील सर्व पदाधिकारी कार्यकर्ते हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
