महत्त्वाच्या बातम्या

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने बाबत महिलांमध्ये गैरसमज

       विधान सभा निवडणूक पार पडल्या नंतर राज्यात महायुतीची सत्ता स्थापन झाली. महायुतीची सत्ता येण्या मागे एकनाथ शिंदेंच्या माझी लाडकी बहीण योजना महत्वाची मानली जात आहे. परंतु आता डिसेंबरचा हप्ता मिळणार की नाही ? अशा अनेक चर्चा सुरू आहेत.
राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वतंत्र्यासाठी, त्यांच्या आरोग्य आणि पोषणा मध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्याची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना  सुरु करण्यास महाराष्ट्र शासनाने 28 जुन 2024 रोजी मान्यता दिली.  या योजने अंतर्गत महाराष्ट्र राज्यातील 21 ते 65 वयो गटातील महिलांना मासिक 1500 रुपये असा आर्थिक लाभ देण्यात येत आहे.
       परंतु  सत्ता स्थापने नंतर लाडकी बहीण योजने संदर्भात समाज माध्यमाकडून , रिल्स,  व्हिडीओ द्वारे वेगळी माहिती प्रसारित करण्यात येत आहे. असे एकात्मिक बाल विकास सेवा योजना कार्यालयाच्या निदर्शनास आले आहे. यामुळे लाभार्थी महिला तसेच जनतेच्या मनात गैरसमज निर्माण होत असून याबाबत वेगवेगळ्या स्तरावरून या कार्यालयाकडे विचारणा होत आहे.
     मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अटी व शर्ती मध्ये तसेच योजनेच्या सद्य स्थिती मधील कार्यपद्धती मध्ये कोणताही बदल झालेला नाही. योजने मध्ये कोणताही बदल झाल्यास प्रशासनाकडून कळविण्यात येईल असे बाल विकास सेवा योजना विभागाने सांगितले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!