सातारा शहरात जुगार प्रकरणी एकास अटक
सातारा जिल्ह्यात जुगार प्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज्यात व देशात अवैध दारू विक्री, जुगार, अशा घटना समोर येत आहेत.अशीच एक घटना सातारा शहरातील महानुभाव मठ करंजे येथे घडली आहे. महानुभाव मठ परिसरात एका व्यक्तीस जुगार खेळताना पकडण्यात आले आहे. त्यावर शाहूपुरी पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा नोंद झाला आहे.
साहेबराव यशवंत शेटे असे जुगार प्रकरणी कारवाई केलेल्या व्यकीचे नाव असून त्याकडून जुगाराचे साहित्य व 1090 रुपये हस्तगत करण्यात आले आहेत. सातारा शहरात गुन्हेगारीचे प्रमाण वाढत चालले असून मागे काही महिन्यांपुर्वी देखील 2 जणांवर जुगार प्रकरणी कारवाई करण्यात आली होती. दि 12 डिसेंबर रोजी जुगार खेळताना साहेबराव शेटे यांना पकडण्यात आले होते. या संदर्भातील पुढील तपास सुरु आहे
