महत्त्वाच्या बातम्या

भैरवनाथ विकास सेवा सोसायटीच्या अध्यक्षपदी श्री जगन्नाथ मानसिंग शिवणकर यांची निवड

    सातारा जिल्ह्यातील  खर्शी तर्फे कुडाळ (ता.जावळी) येथील भैरवनाथ विकास सेवा सोसायटीच्या अध्यक्षपदी श्री जगन्नाथ मानसिंग शिवणकर यांची बिनविरोध निवड झाली आहे.  ही निवडणूक निर्णय अधिकारी श्री एन. बी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. सायगाव विभागात अत्यंत चांगल्या प्रकारे काम करणारी सोसायटी म्हणून या सोसायटीचा तालुक्यात नावलौकीक आहे. सोसायटीचे विद्यमान अध्यक्ष कै.जगन्नाथ सोपान शिवणकर यांचे आकस्मिक निधन झाल्याने ही जागा रिक्त झाली होती. त्याअनुषंगाने या पदासाठी झालेल्या निवडणुकीत अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात सर्व संचालकांनी श्री जगन्नाथ मानसिंग शिवणकर यांची बिनविरोध निवड केली.

      या झालेल्या निवडीमध्ये सातारा जावळीचे आमदार श्री शिवेंद्रराजे भोसले,भैरवनाथ विकास सेवा सोसायटीचे उपाध्यक्ष अशोक भोसले (भाऊ), प्रतापगड सहकारी साखर कारखान्याचे मा.उपाध्यक्ष  अंकुश शिवणकर,कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मच्छिन्द्र मुळीक, रामचंद्र जाधव (आबा),खर्शी गावच्या सरपंच सौ. दुर्गा  भिसे ,कामगार मोर्चा सातारा जिल्हा भाजप उपाध्यक्ष अतुल भोसले,राजेंद्र गजानन शिवणकर, ग्रामपंचायत सदस्य किरण मोरे, सौ. संगीता शिवणकर. सोपान भोसले, सागर शिवणकर, विकास महाडिक, प्रकाश शिवणकर, डॉक्टर सुजित शिवणकर,  शंकर शिवणकर, धैर्यशील भोसले, लक्ष्मण भोसले, जितेंद्र भोसले, संतोष शिवणकर, गणेश पवार , महेश पवार,  विजय मोहिते, विठ्ठल शिवणकर ,हरी शिवणकर,विजय महाडिक , विजय सोनवणे, राहुल शिवणकर, पंकज शिवणकर, श्री संतोष खरात, नामदेव भिसे, नितीन खरात यांचे विशेष सहकार्य मिळाले, निवड झाल्याबद्दल ग्रामस्थ मंडळ खर्शी व ग्रामपंचायत खर्शी तसेच, श्रीराम वरदायिनी सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ खर्शी,श्री सिद्धनाथ नाट्यकला सांस्कृतिक क्रीडा मंडळ खर्शी,श्री भैरवनाथ विकास सेवा सोसायटीचे सर्व संचालक व सर्व सभासदांनी  उपस्थित राहून अध्यक्ष शिवणकर यांचा सत्कार केला.नावलौकिक असणाऱ्या या सोसायटी संचालक व सभासदांनी माझी बिनविरोध अध्यक्ष म्हणून निवड केल्यामुळे, आम्ही सर्वजन चांगल्या पद्धतीने काम करू व दिलेली जबाबदारी पार पाडू असे जगन्नाथ शिवणकर म्हणाले.
 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!