रिपाई कडून अमित शहा यांच्या वक्तव्याचा निषेध
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलेले वक्तव्य निषेधार्य असून त्यांनी हे वक्तव्य माघे घ्यावे अन्यथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ए च्या वतीने त्यांच्याविरोधात आंदोलन पुकारण्यात येईल असा इशारा रिपायीचे जिल्हा अध्यक्ष दादासाहेब ओव्हाळ ह्यांच्या नेतृत्वात पक्षाचे काम करत असलेले रिपायीचे कराड उत्तरचे युवक उपाध्यक्ष मंगेश गायकवाड यांनी दिला. याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात गायकवाड ह्यांनी म्हटले आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत संसदेमध्ये अमित शहा यांनी केलेले वक्तव्य तिरस्कारातून केले आहे. पण डॉ. आंबेडकर यांनी या देशामध्ये लोकशाही प्रस्थापित करण्याकरता परिश्रम घेतले आहेत. त्यामुळे अमित शहा यांनी केलेले बेताल वक्तव्य माघे घ्यावे अन्यथा निषेध करुन आंदोलन करण्यात येईल.
