महत्त्वाच्या बातम्या

प्रजासत्ताक दिनी कर्तव्य पथावर पथचलनासाठी पुण्यातील स्वयंसेवकांची निवड

      प्रजासत्ताक दिन २६ जानेवारी २०२५ रोजी कर्तव्य पथावर होणाऱ्या पथसंचलनासाठी महाराष्ट्रातील विद्यापीठामधून राष्ट्रीय सेवा योजनेतील  १२ स्वयंसेवकाची निवड झाली आहे. या मध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील चार विद्यार्थ्यांची राष्ट्रीय सेवा योजनेचे निवड झाली आहे.  १) कविता शेवरे,  के.टी.एच.एम. महाविद्यालय नाशिक, २) वेदिका राजमाने, भारती विद्यापीठ महिला अभियांत्रिकी महाविद्यालय, पुणे ३) पूजा भोंडगें,  हुजूरपागा  श्रीमती दुर्गाबाई महिला मुकुंदास लोहिया महिला वाणिज्य महाविद्यालय, पुणे, ४) स्वरूप ठाकरे, एन.व्ही.पी. मंडळाचे कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय, लासलगाव, नाशिक असे चार स्वयंसेवक आणि  महाराष्ट्र व गोवा संघाचे संघनायक म्हणून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे  जिल्हा समन्वयक डॉ. पवन शिंगारे, डॉ. बी.एन. पुरंदरे कला,  एस.जी. गुप्ता वाणिज्य व एस. ए. मिठाईवाला विज्ञान महाविद्यालय, लोणावळा, यांची निवड झालेली आहे. 

       उच्च व तंत्र शिक्षण विभाग मंत्रालयाच्या वतीने राज्य स्तरावर प्रजासत्ताक दिन पथसंचलन निवड शिबिराचे आयोजन करण्यात येते. या शिबिरात महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठामधून ३५० हुन अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते. यामध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजनेचे ४४ स्वयंसेवक व २ संघनायक असं संघ सहभागी झाला होता. यामधून पश्चिम विभागीय निवड चाचणी शिबिरा करीता ७० विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली होती.  युवा व क्रीडा मंत्रालय भारत सरकार यांच्या वतीने आयोजित कवियत्री बहिणाबाई उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव येथे झालेल्या पश्चिम विभागीय निवड चाचणी शिबिरात महाराष्ट्रातून या वर्षी ६ मुले व ६ मुलींची निवड राष्ट्रीय प्रजासत्ताक दिन पथसंचलन २०२५ करिता करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठामधून निवड झालेल्या १२ स्वयंसेवकांपैकी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ४ विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. हि विद्यापीठाच्या व रासेयो विभागाच्या  शिरपेचात मानाचा तुरा उंचावणारी व गौरवाची बाब आहे. निवड झालेले विद्यार्थी दिनांक १ जानेवारी २०२५ रोजी दिल्लीकडे रवाना होणार असून दि.२६ जानेवारी २०२५ रोजी कर्तव्य पथावर होणाऱ्या राष्ट्रीय पथसंचलना मध्ये सहभागी होणार आहेत.  

     प्रजासत्ताक दिन पथसंचलन हा भारताचा समृद्ध सांस्कृतिक वारसा आणि लष्करी सामर्थ्याचा उत्सव साजरा करणारा एक प्रतिष्ठेचा कार्यक्रम आहे. पथसंचलनामध्ये भारतीय सशस्त्र दल, निमलष्करी दल आणि एन.एस.एस.सारख्या विविध तुकड्या सहभागी होतात. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. सुरेश गोसावी, प्र-कुलगुरू प्रा.डॉ.  पराग काळकर , प्रभारी कुलसचिव प्रा. डॉ. ज्योती भाकरे, व्यवस्थापन परिषद सदस्या बागेश्री मंठाळकर , विद्यार्थी  विकास मंडळाचे संचालक डॉ.अभिजित कुलकर्णी, डॉ. आशिष सांगळे, NCC ऑफिसर, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ. संदानंद भोसले यांचे मार्गदर्शन या स्वयंसेवकास लाभले. या यशाबद्दल या सर्वानी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे व संघनायक यांचे अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!