५२ व्या विज्ञान प्रदर्शनाचा पारितोषिक वितरण सोहळा संपन्न
माण तालुक्यातील बिदाल येथील नवमहाराष्ट्र विद्या मंदिरात आयोजित ५२ व्या माण तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात माध्यमिक शाळा गटात मेरी माता इंग्लिश मिडियम स्कूल पिंगळी बुद्रुकच्या तनुजा इंदलकर व प. म. शिंदे कन्या विद्यालय दहिवडीच्या वेदांत कुलकर्णी यांनी तर प्राथमिक शाळा गटात प. म. शिंदे कन्या विद्यालय दहिवडीच्या प्रज्ञा राऊत या विद्यार्थ्यांच्या उपकरणांनी प्रथम क्रमांक पटकावला.
पारितोषिक वितरण व समारोप समारंभ उपविभागीय पोलिस अधिकारी अश्विनी शेंडगे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. यावेळी माध्यमिक विभागाचे जिल्हा उपशिक्षणाधिकारी तेजस गंबरे, स्वामी विवेकानंद संस्थेच्या विद्यासमितीचे अध्यक्ष श्रीराम साळुंखे, आजीव सेवक गुलाबराव बोराटे, गटशिक्षणाधिकारी लक्ष्मण पिसे, माण तालुका विज्ञान संघाचे अध्यक्ष विष्णू काटकर, सरपंच प्रमोद जगदाळे, उपसरपंच सारिका मलकमीर, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष किरण जगदाळे, ग्रामपंचायत सदस्य श्रीराम मदने, अमीत कुचेकर, शंकर जगदाळे, माजी सरपंच सुरेश जगदाळे आदी मान्यवर उपस्थित होते.
