गायक राहुल देशपांडे यांच्या कार्यक्रमास रेकॉर्ड ब्रेक गर्दी
ब्रम्हानंद मंडपात श्री गोंदवलेकर महाराजांच्या पुण्यतिथी उत्सव विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये गायन सेवेसाठी श्री राहुल देशपांडे यांचा कार्यक्रम आयोजित केला होता. अत्यंत उत्साहाने उत्सवकाळात भक्तांची गर्दी असतेच मात्र थंडीने जोर धरला आहे म्हणून भाविकांची संख्या कमी असेल असे वाटले होते मात्र प्रत्यक्षात परिस्थिती वेगळी झाली. अभंग आणि शास्त्रीय संगीताची आवड असलेल्या लोकांची गर्दी होतीच मात्र खास करून महिला वर्गाची उपस्थिती सगळ्यांना आश्चर्याचा धक्का देणारीच होती.
अत्यंत सुरेख नियोजन असल्याने कार्यक्रमाला शोभा आली आणि राहुल देशपांडे यांच्या स्वरांनी सारी गोंदवले नगरी मंत्रमुग्ध झाली. भक्तांनी केलेल्या मागण्या देखील विनम्रपणे गायल्याने वेगळीच छाप राहुल देशपांडे यांनी आपल्या सेवेतून दाखवून दिली. वेळ कमी आणि मागण्या जास्त हे राहुल देशपांडे यांचा कार्यक्रम म्हंटले की समीकरण आलेच. कार्यक्रमचा शेवट तीर्थ विट्टल क्षेत्र विट्टल ह्या अभंगाने केला. राहुल देशपांडे यांच्या समवेत सगळ्या भक्तांनी एक सुरात उत्तम साद देत केला कार्यक्रमाचा शेवट केला. तबलावादक श्री पाठक यांनी देखील श्रीभक्तांची मने जिंकली . महिलांची मोठी उपस्थिती नक्कीच वेगळी नांदी ठरण्याची शक्यता आहे. महिलांनी आवर्जून वेळात वेळ काढून कार्यक्रमला उपस्थित राहिल्याचे आणि गायनाने त्याचे समाधान झाल्याचे त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होते . ब्रम्हानंद मंडपात उपस्थित भक्तांची गर्दी आणि उत्तम मिळणारा प्रतिसाद पाहता जास्तीत जास्त अभंग गाण्याचा प्रयत्न देखील राहुल देशपांडे यांनी केल्याने श्रीभक्तांमध्ये देखील उल्हासदायक आणि आनंदी भावना व्यक्त होत होत्या .
