महत्त्वाच्या बातम्या

सोन्यापेक्षाही ग्राहकांचे हित जपणारी मुथुट फिनकॉर्प -सपोनि अक्षय सोनवणे 

       सोन्यापेक्षाही ग्राहकांचे हित जपणारी मुथुट फिनकॉर्प आहे असे प्रतिपादन सहय्यक पोलीस निरीक्षक  अक्षय सोनवणे यांनी केले.सोनेतारण क्षेत्रात संपूर्ण भारतभरात अग्रेसर असणाऱ्या मुथुट फिनकॉर्पच्या दहिवडी शाखेचा प्रथम वर्धापन सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते.कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली व त्यानंतर केक कापण्यात आला. सपोनि अक्षय सोनवणे पुढे म्हणाले,माण तालुक्यासारख्या ग्रामीण भागामध्ये अनेकदा सर्वसामान्य लोकांना आपल्या कौटुंबिक, शैक्षणिक किंवा वैद्यकीय अडचणीसाठी पैशाची अचानक गरज भासते त्यावेळी त्यांना सोने चांदीच्या दुकानदारांचे दरवाजे ठोठवावे लागतात आणि त्यांच्याकडून अव्वाच्या सव्वा व्याजदराने सोने गहाण ठेऊन कर्ज घ्यावे लागते मात्र सध्या दहिवडी शहरात नव्याने सुरु झालेल्या मुथुट फिनकॉर्पच्या शाखेमुळे सर्वच नागरिकांना अतिशय कमीत कमी वार्षिक व्याजदर व जास्तीत जास्त कर्ज अवघ्या काही मिनिटांत उपलब्ध करून दिले जात आहे.यामुळे नक्कीच सर्व माण मधील गोरगरीब जनतेची अडचणीच्या काळात होणारी आर्थिक लूट कमी होईल.

     त्याचबरोबर गतवर्षात प्रामाणिक कामगिरी बजावणारे व मुथुटच्या दहिवडी शाखेचे जाळे संपूर्ण माण तालुक्याच्या कानकोपऱ्यात पोहोचवणारे दहिवडी शाखेचे शाखाधिकारी सागर दुबळे यांचे कौतुक केले व त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी मुथुटचे एरिया मॅनेजर महेश पाटील,मुथूटचे दहिवडी शाखाधिकारी सागर दुबळे,मायणी अर्बन बँकेचे शाखाधिकारी सचिन काळे, दहिवडी अर्बनचे अशोक जाधव, बुलढाणा अर्बनचे विकास जाधव, पत्रकार प्रविण राजे,निलेश राजेमाने, सिकंदर शेख, वैभव शिंदे, माधुरी तोरणे, मनीषा कट्टे व मुथुट फिनकॉर्पच्या दहिवडी शाखेचे सर्व ग्राहक व कर्मचारी उपस्थित होते.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!