आपले सरकार सेवा केंद्र, महाराष्ट्र तज्ञ ऑपरेटर युनियनच्या अध्यक्षा यांचे नागपूर येथे उपोषण
आपले सरकार सेवा केंद्र, महाराष्ट्र तज्ञ ऑपरेटर युनियनच्या अध्यक्षा यांचे नागपूर येथे यशवंतराव चव्हाण क्रीडा संकुल मध्ये आमरण उपोषण सुरु होते.उपोषण स्थळास भेट देऊन त्यांना त्यांचे प्रश्न तात्काळ सोडवून त्यांना न्याय मिळवून देण्याचे आश्वासन देऊन उपोषण मागे घ्यायला लावले. त्यांना नारळ पाणी घेऊन उपोषण मागे घेतले.
उपोषणकर्त्यांनी कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार माननीय मनोजदादा घोरपडे यांचे आभार मानून उपोषण मागे घेतले. आमदार मनोजदादा घोरपडे यांनी उपोषणकर्त्यांचे शिष्टमंडळ मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांना भेटवले व त्यांच्या प्रश्नात मार्ग काढण्याचे आश्वासन घेऊन तसे पत्र जारी करायला लावले. त्यामुळे नागपूर मिडियानेही आमदार मनोजदादा घोरपडे यांचे भरभरून कौतुक करून त्यांची मुलाखत उपराजधानी नागपूर येथे प्रसिद्ध केली.
