जनता अर्बन बँके म्हणजे सामाजिक बांधिलकी जोपासणारीबँक :- अश्विनी महांगडे
जनता अर्बन को-ऑपरेटीव्ह बँकेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे २०२५ च्या दिनदर्शिकेचे (कॅलेंडर) प्रकाशन बँकेचे सोनगिरवाडी येथील मुख्य कार्यालयाचे ठिकाणी वाई येथे वाई पंचकृशीस लाभलेल्या प्रसिद्ध मराठी अभिनेत्री “अश्विनी महांगडे” यांच्या प्रमुख उपस्थिती करण्यात आले. यावेळी बँकेचे अध्यक्ष बळीराम जगताप, उपाध्यक्ष शेखर फरांदे, संस्थापक – संचालक सुरेशराव कोरडे, संचालक जगन्नाथ कदम, महेंद्र जमदाडे, रमेश बुलुंगे, निळकंठ मोरे, तज्ञ संचालक मदन शिंदे, सीए चेतन कोदे, बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. रुपाली बुलुंगे व बँकेचे अधिकारी उपस्थित होते. सन – २०२५ चे दिनदर्शिकेमध्ये सालाबादप्रमाणे तिथी, पंचांग, मराठी महीने, विविध सण, यात्रा इत्यादींचा समावेश आहे.
यावेळी अध्यक्ष बळीराम जगताप यांनी,सभासदांनी बँकेच्या विविध योजनांचा लाभ घेऊन बँक प्रगतीस हातभार लावावा, असे आवाहन केले आहे. सर्व सभासदांनी दिनदर्शिका २०२५ बँकेच्या नजिकच्या शाखेतून घेऊन जावी असे आवाहन संचालक मंडळाने केले आहे.
जनता अर्बन को ऑपरेटीव्ह बँक लि वाई. ही सर्वसामान्यांची बँक जनतेची, जनतेसाठी, जनतेबरोबर या ब्रीद वाक्यानुसार नेहमीच सामाजिक बांधिलकी जोपासत आलेली आहे – अभिनेत्री अश्विनी महांगडे यांनी काढले.
