महत्त्वाच्या बातम्या

पाटण तालुक्यात अवैधधंदे जोरात,मटक्यासह जुगार, गुटखा, दारू विक्री पोलिसांवर राजकिय दबाव

 

पाटण : पाटण तालुक्यात अवैध धंदे जोरात सुरू आहेत, मात्र पोलिस प्रशासन कोमात अशी बिकट अवस्था आहे. राजकिय वरदहस्तामुळे हे धंदेसुरू असल्याचे दिसते. त्यामुळे पोलिस प्रशासन याच्या वर राजकीय दबाव आणल्याने अवैध धंदे करणाऱ्या वर वचक नसल्याचे दिसून येत आहे. पाटण तालुक्यातील तारळेसह इतर गावांतील लोकांचा जास्त संबंध आठवडी बाजार, बँक, तसेच इतर कामासाठी सर्वाधिक प्रमाणात येतो. याच पाटण तालुक्यात मोठ्या प्रमाणावर उघडपणे अवैध धंदे चालू असून यामुळे हजारो नागरिकांचे संसार धुळीला मिळाले आहेत.

 

मटक्यामुळे हजारो जणांच्या संसाराच्या राखरांगोळ्या होत असल्याचे आढळून येत असून याकडे जाणूनबुजून प्रशासनाच्या वतीने दुर्लक्ष केले जात आहे. केवळ शहरात फक्त सर्वसामान्य लोकांच्या मोटारसायकल उचलून नेऊन मोटारसायकल वाहन कायदे नियम दाखवून वसुली जोरात सुरू असल्याने जनतेच्या तोंडून एकच प्रतिक्रिया येत आहे. पोलिस ठाणे हे फक्त ट्राफीक पोलिस ठाणे झाले की काय ? शहरात जागोजागी मटका, विनापरवाना अंडा भुर्जी टपरीवर दारू विक्री, तसेच टू व्हिलरवर टोमधून देशी दारू बॉक्स ग्रामीण भागात जातात. गुटख्याच्या गाड्या शहरात येऊन विक्रेत्यांना देऊन जातात तरीही कुठलीही कारवाई नसते.

 

पोलिस ठाणे परिसरात दिवसाढवळ्या हे सर्व काम चालू आहे. त्यावर कुठलेही अॅक्शन पोलिसांना घेता येत नाही काही राजकीय अधिकाऱ्यांनी पोलिसांचे हात बांधले आहेत .पोलिसांची अवस्था गांधीजी के तीन बंदर ना देखो ना सुनो काही बोलता येत करून ठेवले आहे .काही ॲक्शन .घेतल्या तर पोलीस कर्मचाऱ्यांच्या असा प्रकार आहे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने अवैध धंदे जोमाने सुरू .तारळे ग्रामपंचायत सदस्य याकडे सोईस्करपणे दुर्लक्ष करताना दिसत आहेत पाठराखण चालू आहे. असल्याचे जनतेतून प्रतिक्रिया आहे. ग्रामीण भागातून येणारे शेतकरी व्यापारी, तरुण वर्गमोठ्या प्रमाणावर मटका खेळत असल्याने व हीच पुरुष मंडळी घरगुती संसारासाठी लागणारे पैसे इतरांकडून व्याजाने घेऊन त्यातून मटका खेळणे, दारू पिणे अशा वाईट सवयीसाठी खर्च करत असल्याने महिला वर्गात चिंतेचे वातावरण पसरले आहे. यावर अजून पण राजकीय मंडळी व प्रशासन लक्ष घालत नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!