महत्त्वाच्या बातम्या

सुशिला शंकरराव गाढवे महाविद्यालयात “वाचन संकल्प महाराष्ट्राचा” उपक्रमाचे आयोजन

        खंडाळा येथील सुशिला शंकरराव गाढवे महाविद्यालय, वाड्मय मंडळ, ग्रंथालय विभाग,राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि एकता सार्वजनिक ग्रंथालय व वाचनालय, खंडाळा यांच्या संयुक्त विद्यमाने उच्च व तंत्रशिक्षण विभाग महाराष्ट्र शासन यांच्या सूचनेनुसार महाविद्यालयात ०१ जानेवारी “वाचन संकल्प महाराष्ट्राचा” उपक्रम राबविण्यात आला.या समारंभासाठी राजेंद्र विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय प्राचार्य शब्बीर नालबंद यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी डॉ. प्रतिभा पाटणे यांनी उपस्थित मान्यवर एकता ग्रंथालय व सार्वजनिक वाचनालय चे अध्यक्ष जितेंद्र गाढवे, सचिव विकास गाढवे संचालक योगिता विकास गाढवे, ग्रंथपाल रेश्मा हणमंत यादव यांचे स्वागत केले.

      प्रास्ताविक करताना रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. प्रदीप मेंढापुरे म्हणाले-“वाचन आणि तरुणाई हे वैचारिक नातं दृढ करण्यासाठी महाराष्ट्र शासनाचा उच्च व तंत्रशिक्षण विभागाने वाचन संकल्प महाराष्ट्राचा सप्ताह उपक्रम सुरू केला आहे. यामध्ये एकता ग्रंथालय,राजेंद्र विद्यालय व वरिष्ठ महाविद्यालय यांच्या वाचक विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग आहे.” यावेळी विद्यार्थी प्रतिनिधी अभिषेक शितोळे याने शाहुंच्या आठवणी पुस्तकातील संदर्भाचे, समीक्षा माने हीने सहवास विस खांडेकर, इ. १० वी अ ची विद्यार्थिनी दिल्ली ऊंचा सुनती सुनती हैं या पुस्तकातील संदर्भाचे प्रकट वाचन केले.

     डॉ.पाटणे यांनी वाचन प्रेरणेसाठी ०६ जानेवारी रोजी होणाऱ्या पुस्तक परीक्षण स्पर्धेची माहिती दिली.
या समारंभाचे निवेदन प्रा. अमीर इनामदार यांनी, आभार ग्रंथपाल अर्चना राऊत यांनी मानले. प्रा. येवले, प्रा. ओंबळे, प्रा. पाटील, प्रा. मोरे, प्रा. चव्हाण, प्रा. मोरे, प्रा. गायकवाड प्रा. वाघापुरे आदींची उपस्थिती होती.हणमंत यादव, गेनबा चव्हाण यांनी विशेष परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!