महत्त्वाच्या बातम्या

NOAA ने दिला सतर्कतेचा इशारा- पृथ्वीच्या दिशेने येत आहे सौर वादळ

 

           पृथ्वीच्या दिशेने एक मोठे सौर वादळ येत आहे. अमेरिकन वैद्यानिकांनी सूर्यावरून उत्सर्जित झालेल्या शक्तिशाली सौर ज्वलांमुळे एक गंभीर भुचुंबकीय वादळाचा इशारा दिला. हे वादळ X7.1 श्रेणीतील असून , 1 ऑक्टोबर 2024 रोजी सूर्यावरुन फुटले आहे. हे वादळ पृथ्वीवर आदळण्याची शक्यता आहे. ‘ कोरोनल मास एजेक्शन (CEM) नावाची शक्ती पृथ्वीच्या दिशेने साधारण 500 किमी सेकंद वेगाने येत आहे. 

     सौर वादळ म्हणजे सूर्याद्वारे सूर्यमालिकेत प्रक्षेपित केलेले कण, ऊर्जा, चुंबकीय क्षेत्र आणि पदार्थ यांचा अचानक झालेला स्फोट. या वादळाला भूचुंबकीय वादळ असे म्हणतात.अमेरिकेच्या नॅशनल ओशनिक ऍटमोस्फेरिक ऍडमिनिस्ट्रेशन (NOAA) ने या वादळाल G3 श्रेणी दिली आहे.या वादळामुळे सॅटेलाइट यंत्रणांमध्ये अडचणी येण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे वीज यंत्रणा आणि तंत्रज्ञानावर याचा परिणाम होऊ शकतो. जीपीएस सारख्या सॅटेलाइट नेव्हिगेशन प्रणालींमध्ये देखील अचूकतेत त्रुटी येऊ शकतात. या वादळाचा परिणाम 50 अंश भुचुंबकीय अक्षांशावरील प्रदेशांवर होण्याची शक्यता आहे. उच्च वारंवारता रेडिओ प्रणाली मध्ये अडचणी येऊ शकतात. याशिवाय भुचुंबकीय वादळामुळे नयनरम्य अशा अरोरा म्हणजेच उत्तर ध्रुवीय प्रकाशाचे दर्शन घडण्याची शक्यता आहे. सामान्यत: हे प्रकाश उत्तर ध्रुवावरतीच दिसतात. परंतु यावेळी ते दक्षिणेकडच्या बाजूसही पाहता येऊ शकतील.

    भारतीय शास्त्रज्ञ आणि अंतराळ संस्था ISRO देखील या वादळावर लक्ष ठेऊन आहेत.या वादळाचा येत्या काही दिवसात तांत्रिक प्रणालीवर परिणाम होण्याची शक्यता असल्याने सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!