महत्त्वाच्या बातम्या

माण पंचायत समितीतील शाखा अभियंता लाचलुचपतच्या सापळ्यात 

  लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, सातारा या पथकाने आज माण पंचायत समितीत सापळा रचून जिल्हा परिषद बांधकाम विभागातील शाखा अभियंत्यावर कारवाई करुन त्यांना ताब्यात घेतले. बांधकाम ठेकेदार असलेल्या तक्रारदाराने उर्किडे (ता. माण) येथील जिल्हा परिषद शाळा खोलीचे बांधकाम केले आहे. त्याचे बिल मंजूरीसाठी पाठवण्यासाठी लोकसेवक जिल्हा परिषद बांधकाम विभाग, उपविभाग दहिवडी येथे शाखा अभियंता म्हणून कार्यरत असलेल्या भरत संभाजी जाधव (वय : ५४ वर्ष, रा. दहिवडी) यांनी तक्रारदाराकडे २०,०००/- रुपये लाचेची मागणी केली होती. यापैकी १५,०००/- रुपये लाच रक्कम खाजगी व्यक्ती बुवासाहेब जगदाळे (वय : ६१ वर्ष, रा. बिदाल, ता. माण) यांच्या मार्फतीने पंचायत समिती बांधकाम विभाग कार्यालय, दहिवडी या कार्यालयात स्विकारली. त्यामुळे भरत जाधव व बुवासाहेब जगदाळे यांच्या विरोधात दहिवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

     ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणेचे पोलिस अधिक्षक शिरीष सरदेशपांडे व अपर पोलिस अधीक्षक विजय चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपअधिक्षक राजेश वाघमारे, पोलिस हवालदार नितीन गोगावले, निलेश राजपूरे व गणेश ताटे यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!