महत्त्वाच्या बातम्या

सोनगाव ता.जावळी येथे रक्तदान महायज्ञ संपन्न

     जगात अनेकजण दान करतात मात्र जगात खऱ्या अर्थाने रक्तदान हे श्रेष्ठ दान मानले जात. जगतगुरू नरेंद्रमहाराज संस्थानच्या वतीने दरवर्षी एक लाख व त्यापेक्षा जास्त रक्तदान करण्याचा केला जाणारा संकल्प कौतुकास्पद असाच आहे असे गौरवोदगार पुणे येथील युवा उधोजक सुहास साखरे यांनी काढले.
       सोनगांव ता.जावळी येथे अनंत श्री विभुशीत जगद्गुरु श्री रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली रक्तदान महायज्ञ  कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी जिल्हा अध्यात्मिक प्रमुख जितेंद्र कदम,ब्जिल्हा जणगणना प्रमुख कोमल मोझर, जावळी तालुका प्रमुख सुनील बोराटे, तालुका सचिन सुभाष आगाटे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी माऊली ब्लड बँकेचे व डॉ भटड यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
       जिल्हा प्रमुख जितेंद्र कदम बोलताना म्हणाले,राज्यात या संस्थानच्या वतीने महामार्गावर अपघातग्रस्ताना तातडीची मदत मिळावी म्हणून ठिकाठिकाणी 52 रुग्णवाहीका विनामोबदल देण्यात आलेल्या आहेत व आणखीही अशी अनेक सेवा पूरविणारी सामाजिक कामे केली जात आहेत. सर्व सेवक या कामी मोलाची मदत करत असतात. लोकांनीही यासाठी पुढे यावे असे आवाहन श्री कदम यांनी केले.

     यावेळी तालुक्यातून 76 रक्तदात्यांनी रक्तदान केले. याप्रसंगी जावळी तालुका पत्रकार संघांचे अध्यक्ष प्रशांत गुजर, संतोष निकम, विजय निकम,  रोहित बीबाट,निषाद पिसाळ, अतूल साळुंखे, ब्लड कॅम्प प्रमुख महेश शिंदे, अनिकेत बिद, अनिल चिकणे, काबीनाथ साबळे, पांडुरंग निकम, सुनिता गायकवाड, मनोहर बीबाटे, संभाजी भोईटे यांच्यासह जावळी तालुक्यातील सेवक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!