आईच्या स्मरणार्थ दिले तब्ब्ल 3 लाख 20 हजारांचे सीसीटीव्ही
ज्या भूमीत आपण जन्मलो त्या गावासाठी आपण काहीतरी केले पाहिजे या भावनेने आपल्या आईच्या स्मरणार्थ गावासाठी तब्बल तीन लाख विस हजार रुपयांचे सिसिटीव्ही कॅमेरा बसवून देऊन खऱ्या अर्थाने सातारा तालुक्यातील मर्ढे गावच्या डॉक्टर सुपुत्राने समाजापुढे एक आदर्श निर्माण केला आहे.
मर्ढे गावचे सुपुत्र श्रीकांत नथुराम धुमाळ यांनी आपली मातोश्री कै श्रीमती रत्नप्रभा नथुराम धुमाळ यांच्या स्मरणार्थ आपल्या गावासाठी काहीतरी उपयोगी वस्तू द्यायची आहे, असे गावच्या लोकनियुक्त सरपंच सविता शरद शिंगटे यांना सांगितले तेव्हा त्यांनी बाजारपेठेतील तसेच कृष्णा नदीकाठी वसलेले गाव असल्याने व नवकवी बा.सी मर्ढेकर यांचे स्मारक येथे असल्याने रोज शेकडो लोकांची येथे ये जा असते तसेच अनेक फेरीवाले देखील येथे येत असतात. अनेक चोरीच्या पण घटना घडतं असतात यामुळे येथे सिसिटीव्ही ची महत्वाची गरज असल्याचे डॉ धुमाळ यांना सुचविले, त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता ताबडतोब त्यांनी ही सूचना मान्य करत, गावामध्ये जवळपास तीन लाख वीस हजार रुपयांचे सोळा कॅमेरे देऊ केले व लगेचच प्रत्यक्षात ते बसवून दिले, त्यांना अशा प्रकारे आपल्या आईच्या स्मरणार्थ गावासाठी उपयोगी भेट दिल्याने सर्व ग्रामस्थांनी कोतुक केले. सिसिटीव्ही बसवल्यामुळे आता इथून पुढे परिसरातील व गावात घडणाऱ्या गुन्ह्यांना आळा बसणार असून सर्व गाव सिसिटीव्हीच्या नजरेत असल्यामुळे गावात स्वछता देखील राहणार आहे. याचे अनेक फायदे असल्याने गावच्या विकासात देखील भर पडणार आहे.
डॉ श्रीकांत धुमाळ यांनी गावासाठी दिलेल्या योगदानाबद्दल ग्रामस्थांच्या वतीने त्याचे लोकनियुक्त महिला सरपंच सविता शरद शिंगटे, उपसरपंच विक्रम शिंगटे, संजू बापू शिंगटे,उमेश शिंगटे, संजय शिंगटे, उमेश कुलकर्णी, अंकुश कदम, भिकाजी किर्वे व ग्रामस्थ महिलांच्या उपस्थितीत शाल श्रीफळं देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी सरपंच सविता शिंगटे यांनी डॉ धुमाळ यांचे कौतुक करताना असे दानशूर आपल्या गावात अनेक आहेत प्रत्येकांनी आपले असे योगदान देऊन हातभार लावला तर गावातील अनेक अडचणी मिटू शकतील असे सांगितले.
