न्याय द्या नाहीतर इच्छा मरणाची परवानगी द्या अशी मागणी करत प्रा. दिलीप टोबे यांचे उच्च शिक्षण संचालनालय पुणे येथे आंदोलन सुरू
पूर्णवेळ वेतन द्या अन्यथा इच्छा मरणाची परवानगी मिळावी अशी मागणी आबासाहेब काकडे कला महाविद्यालय, बोधेगाव, ता.शेवगाव, जिल्हा अहिल्यानगर येथील प्रा. दिलीप ठोंबे यांनी मा. संचालक, उच्च शिक्षण, शिक्षण संचालनालय, पुणे व मा. सहसंचालक, उच्च शिक्षण, पुणे यांचेकडे निवेदनाद्वारे आणि मा. संचालक, उच्च शिक्षण, शिवाजीनगर पुणे यांच्या कार्यालयासमोर उपोषण करत असताना केली आहे. त्यांच्या उपोषणाचा आजचा पहिला दिवस होता. त्यांच्या उपोषणाला भेट दिली. सोबत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषद सदस्य प्रा. संदिप पालवे सर उपस्थित होते. प्रा. दिलीप ठोंबे यांनी सांगितले की, शासन निर्णयानुसार नियुक्ती पासून सन १९९९ पासून त्यांच्या इतिहास अधिव्याख्याता पदाचा पूर्णवेळ कार्यभार असून, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे यांनी कायमस्वरूपी पूर्णवेळ मान्यता पत्र दिलेली आहेत. मा. सहसंचालक, उच्च शिक्षण, पुणे यांनी सन २००६ मध्ये केलेल्या अनुदान निर्धारण अहवालात सदर इतिहास अधिव्याख्याता पदाला पूर्णवेळ मान्यता दिलेली आहे. मा. उच्च न्यायालयाने दोन वेळा सकारात्मक आदेश दिलेले असून देखील मा. विभागीय सहसंचालक, उच्च शिक्षण, पुणे विभाग, पुणे पूर्णवेळ वेतननिश्चिती करण्यास टाळाटाळ करत आहेत.
प्रा. दिलीप ठोंबे हे दि. ३१/०५/२०२५ रोजी सेवानिवृत्त होत असून, ब्रिटिश मनोवृत्तीच्या भारतीय प्रशासनातील अधिकाऱ्यांची अन्यायकारक भूमिका कमी होत नाही. मागील अनेक वर्षात त्यांच्यावर मोठा अन्याय झालेला आहे. आर्थिक, मानसिक पिळवणूक, फसवणूक, शोषण आणि छळ करण्यात आलेला आहे. त्यांच्या महाविद्यालयातील राज्यशास्त्र विषयाचे प्रा. बाळासाहेब बनसोडे यांच्या मृत्यूस ही परिस्थिती जबाबदार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे आता संघर्षांची ही शेवटची लढाई असून, पूर्णवेळ वेतन द्या अन्यथा इच्छामरणाची परवानगी द्या अशी मागणी प्रा. दिलीप ठोंबे यांनी मा. संचालक, उच्च शिक्षण, शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, शिवाजी नगर, पुणे यांच्या कार्यालयाकडे केली आहे. या वरिष्ठ कार्यालयाने मा. सहसंचालक, उच्च शिक्षण, पुणे या कार्यालयाला पूर्णवेळ वेतननिश्चितीचे आदेश द्यावेत व वेतननिश्चिती होऊन पूर्णवेळ वेतन मिळावे. अन्यथा न्याय किंवा इच्छामरणाची परवानगी मिळावी, असे त्यांनी सांगितले.
१) एखाद्या प्राध्यापकाला आयुष्यभर काम करून जर पुर्ण वेतन मिळत नसेल तर ही अत्यंत गंभीर बाब आहे. आंदोलक प्रा. दिलीप टोबे यांची आज भेट घेतली. व उद्या संचालक शैलेंद्र देवळाणकर यांची भेट आम्ही विद्यापीठ विद्यार्थी संघर्ष कृती समितीच्या वतीने घेणार आहोत. व त्यांच्याकडे न्यायाची मागणी करणार आहोत.
राहुल ससाणे (अध्यक्ष – विद्यापीठ विद्यार्थी संघर्ष कृती समिती)
२) व्यवस्थान परिषद सदस्य या नात्याने प्राध्यापकांचे प्रश्न समजून घेणे व त्यांच्या हक्कांसाठी संघर्ष करणे हे आमचे काम आहे. आज शिक्षण संचालनालय येथी आंदोलन स्थळी प्रत्यक्ष भेट दिली व काही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या भेट घेऊन हा प्रश्न त्यांच्यासमोर मांडला आहे. जर या प्राध्यापकांना न्याय मिळाला नाही तर सर्व प्राध्यापक संघटनांना एकत्रित करून आम्हाला आंदोलन करावे लागेल.
