महत्त्वाच्या बातम्या

राज ठाकरेंनी घेतला पश्चिम महाराष्ट्र दौरा हाती

 

 

राज्यातील राजकीय स्थिती विचित्र असून, मतदारांना सत्ताधारी आणि विरोधकांचाही कंटाळा आला आहे. त्यामुळे मनसे हा योग्य पर्याय असणार आहे. त्यामुळे ही विधानसभा जिंकण्यासाठी तयार रहा असे आवाहन राज ठाकरे यांनी केले.

विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजत सर्वच राजकीय पक्षांमधील घडामोडींना वेग आला आहे. पुणे दौऱ्यावर असलेले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज पश्‍चिम महाराष्ट्रातील विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेतला.

 

यामध्ये पुणे शहर जिल्हा, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या पाच जिल्ह्यातील पदाधिकारी, इच्छुक उमेदवार उपस्थित होते. प्रत्येक जिल्ह्यानिहाय राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला.

मनेसेचे नेते शिरीष सावंत, अनिल शिदोरे, अविनाश अभ्यंकर, बाबू वागस्कर, अविनाश जाधव, अभिजित पानसे, सरचिटणीस हेमंत संभूस, बाळा शेडगे, अजय शिंदे, किशोर शिंदे, शहराध्यक्ष साईनाथ बाबर, योगेश खौरे आदी उपस्थित होते.

 

महाराष्ट्रातील जनता केवळ सत्तेसाठी एकत्र येणाऱ्या युती आणि आघाडीतील राजकारणाला कंटाळली आहे. त्यांना जनतेचे काही देणेघेणे नाही. अशा काळात मनसे हा योग्य पर्याय मतदारांपुढे असणार आहे. विधानसभेची लढाई लढताना तुमची भूमिका महत्त्वाची असणार आहे, त्यामुळे तयारीला लागा, मतदारांपर्यंत पोचा. योग्य वेळी उमेदवार जाहीर केले जातील, सर्वजण एकदिलाने काम करा अशी सूचना यावेळी राज ठाकरे यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!