गणेश आझाद मंडळाच्या मंदिराचे के. मंत्री मुरलीधर मोहळ यांच्या हस्ते जीर्णोद्धार सोहळा
पुणे : श्री गणेश आजाद हिंद मंडळाने नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने विजयादशमीच्या शुभदिनी भव्य नूतन मंदिर सोहळ्याचे आयोजन केले आहे. हा सोहळा 12 ऑक्टोबर 2024 रोजी सायंकाळी 7:00 वाजता, बुधवार पेठ, पुणे येथे संपन्न होणार आहे.
कार्यक्रमाची सुरूवात सकाळी 10:00 वाजता श्री गणेश आणि श्री दुर्गामाताची नगर प्रदक्षिणेने होणार आहे. त्यानंतर वास्तुशांती हवन आणि सायंकाळी मंदिराच्या जीर्णोद्धाराचा मुख्य सोहळा पार पडेल.
कार्यक्रमाचे मुख्य अतिथी म्हणून केंद्रीय राज्यमंत्री मा.खास. श्री. मुरलीधर अण्णा मोहोळ उपस्थित राहणार आहेत. त्याचबरोबर प्रतिष्ठित पाहुणे म्हणून मा. चंद्रकांतदादा पाटील, मा. पुनितदादा बालन, मा. संदीपान भोसले, आणि अन्य मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती अपेक्षित आहे, ज्यामध्ये राजकीय, सामाजिक, आणि सांस्कृतिक क्षेत्रातील प्रतिष्ठित व्यक्तींचा समावेश असेल.
