महत्त्वाच्या बातम्या

बहुजन अधिकारी कर्मचारी महासंघाच्या अध्यक्षपदी स्वप्नाली बनसोडे

    बहुजन अधिकारी कर्मचारी महासंघाच्या माण तालुका अध्यक्षपदी ऍड स्वप्नाली बनसोडे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.  ऍड स्वप्नाली बनसोडे यापूर्वी कास्ट्राईब शिक्षक संघटनेच्या सल्लागार पदावर कार्यरत होत्या.माण तालुक्यातील कर्मचाऱ्यांच्या हितासाठी अनेक मोर्चामध्ये पुढाकार घेऊन त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले आहेत. जुनी पेन्शन साठी झालेल्या आंदोलनात त्यांचा सहभाग होता. पंचायत समिती माण ते दहिवडी तहसील कार्यालयावर काढण्यात आलेल्या मोर्च्यात त्या प्रमुख शिलेदार होत्या. त्यांच्या कार्याची दाखल घेत त्यांची बहुजन अधिकारी महासंघाच्या माण तालुका अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली .निवडीबद्दल कास्ट्राईब शिक्षक संघटनेतील पदाधिकारी व माण तालुक्यातील विविध क्षेत्रातून त्यांचे अभिनंदन केले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!