36 व्या राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियान 2025 निमित्त महाराष्ट्र आरटीओ माहिती बोर्डचे जनहितार्थ मोफत वितरण व प्रदर्शन
36 व्या राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियानाचा एक भाग म्हणून माननीय पोलीस अधीक्षक सातारा, समीर शेख यांच्या संकल्पनेतून मधुकर शेंबडे सुरक्षित रस्ता वाहतूक विषयाचे अभ्यासक यांनी MH01 ते MH57 आरटीओ विभागाची माहिती संकलीत केली.
महाराष्ट्रातील एकूण 57 आरटीओ उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाची माहिती, मोटार वाहन नोंदणी कार्यालय, त्यांचे कार्यक्षेत्र, ठिकाण, गाव, शहर इत्यादी माहिती परिवहन आयुक्त कार्यालय महाराष्ट्र मुंबई येथे समक्ष जाऊन संकलित केली.शासन, जनता, वाहतूक पोलीस, नागरिक, विद्यार्थ्यांना याबाबत वाहतूक साक्षर करण्यासाठी बनावट व खोटी चुकीची मोटार वाहन नंबर प्लेट शोधण्यासाठी व कोणते मोटार वाहन कोणत्या शहरातील आहे हे माहीत व्हावे, अपघात करून फरार झालेले मोटार वाहन, तिच्या नंबर प्लेट वरून मालकाचा पत्ता शोधणे इत्यादी अनेक कामांसाठी पोलीस दल व सामान्य गरजू नागरिक यांना अवगत व्हावी यासाठी सदर बोर्ड सातारा शहर वाहतूक शाखेत प्रदर्शित करण्यात आला.
