महत्त्वाच्या बातम्या

शिवसेनाप्रमुख, हिंदुहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवसेना पक्षाकडून ‘शिवोत्सव’ कार्यक्रमाचे आयोजन

    वंदनीय शिवसेनाप्रमुख, हिंदुहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवसेना पक्षाकडून ‘शिवोत्सव’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शिवसेना पक्षाचे मुख्य नेते आणि राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री मा. एकनाथजी शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झालेल्या या कार्यक्रमास राज्याचे पर्यटन मंत्री मा. ना. शंभूराज देसाई  हे विधिमंडळातील व पक्षातील सहकाऱ्यांसह उपस्थित राहिले. 

      यावेळी उपमुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे  व शिवसेना पक्षाचे ज्येष्ठ नेते मा. गजानन कीर्तीकर  यांच्या हस्ते मा. ना. शंभूराज देसाई यांचा  विधानसभा निवडणुकीतील विक्रमी मताधिक्याने झालेल्या विजयाबद्दल सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला. यावेळी शिवसेना पक्षाचे सर्व मंत्री, खासदार, आमदार, नेते, उपनेते यांच्यासह सर्व पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!