महत्त्वाच्या बातम्या

अवैध धंद्याविरुद्ध पोलिसांची धडक कारवाई, हातभट्टी, दारू अड्यावर कारवाई

    लोणी काळभोर आणि परिसरात पोलिसांनी गेल्या काही दिवसात तीन ठिकाणी छापे मारून अवैध धंद्यावर कार्यवाही केली आहे. २१ जानेवारीला रामदरा रोड येथे प्रेमलाता कुमावत या महिलेला ताब्यात घेऊन तिच्याकडून ८८.७०० रुपयांचे रसायन जप्त केले तसेच १८ जानेवारी काळुबाई मंदिराच्या मागे संगीता भालेकडून ३२ लिटर गावठी दारू जप्त केली आणि २२ जानेवारीला लोणी स्टेशन, कदम वाक वस्ती येथे मटका जुगारावर छापा टाकून तात्यासाहेब ससाने यांना अटक केली. त्यांच्याकडून ३,३५० रुपये रोख आणि जुगार साहित्य जप्त करण्यात आले. या कारवायांमुळे अवैध धंद्यामध्ये दहशत निर्माण झाली असून नागरिकांनी पोलीस मोहिमा सुरूच ठेवाव्यात अशी मागणी केली आहे.
       पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही कारवाई वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या कारवाईत अनेक पोलीस अधिकारी आणि कर्मचारी सहभागी होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!