महत्त्वाच्या बातम्या

छत्रपती शाहू स्टेडियम येथे प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा

    सातारा येथील छत्रपती शाहू स्टेडियम च्या मैदानावर आज प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात पार पडला.
पर्यटन मंत्री नामदार शंभूराजे देसाई यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी संतोष पाटील, पोलीस अधीक्षक समीर शेख,सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी, याशनी नागराजन उपस्थित होत्या.
        याचबरोबर शासनाचे सर्व विभाग प्रमुख अधिकारी वर्ग कर्मचारीवर्ग त्याचबरोबर सातारा शहरातील अनेक विद्यालय महाविद्यालयीन विद्यार्थी उपस्थित होते.
आपल्या भाषणात बोलताना ना शंभूराजे देसाई म्हणाले की, सातारा जिल्ह्याचे दुसऱ्यांदा पालकमंत्री पद मिळाल्याने जबाबदारी वाढली आहे. पर्यटन मंत्री या नात्याने सातारा जिल्ह्यात अनेक पर्यटन स्थळाचा विकास करण्यात येणार आहे. त्याचबरोबर मुनावळे येथील वॉटर स्पोर्ट च्या धर्तीवर शिवसागर जलाशयात आणखी एक वॉटर स्पोर्ट प्रकल्प राबविण्यात येणार आहे. त्याच बरोबर निवडणुकीआधी दिलेली वचने यांच्या 100 दिवसात पूर्ण करण्याचे आमच्या मंत्रिमंडळ चा मानस असल्याचे सांगितले.
       मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार व एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा जिल्हा हे देश पातळीवर रोल मॉडेल बनविण्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून चारही मंत्री त्या दिशेने वाटचाल करत आहेत. या वेळी जिल्हा परिषदे मार्फत आरोग्य कृषी शेती शिक्षण बांबू उद्योग याविषयीचे चित्ररथाचे संचलन झाले. त्याचबरोबर अनेक महाविद्यालयाने वेगवेगळ्या संकल्पनेवर चित्ररथाचे आयोजन करण्यात आले होते. तदनंतर चित्त थरारक मैदानी खेळांचे आयोजन करण्यात आले होते.सदर संचलनास सातारा पोलीस दलाच्या बँड पथकाने संगीत साथ दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!