महत्त्वाच्या बातम्या

पिंपरी चिंचवड मध्ये एका दिवसात सात आत्महत्या, शहरात खळबळ

    पिंपरी चिंचवड शहरात एका दिवसात सात जणांनी आत्महत्या केल्याने नागरिकांमध्ये मोठे चिंता व्यक्त केली जात आहे. आत्महत्या करणाऱ्या मध्ये सहा पुरुष आणि एका  महिलेचा समावेश असून  त्यातील सहा जणांनी गळफास घेतला तर एकाने इमारतीवरून उडी मारली.
ही धक्कादायक घटना रावेत, हिंजवडी, वाकड ,सांगवी, चिखली आणि चाकण या भागामध्ये घडली. आत्महत्या करणाऱ्या माध्यम गौरव  अगाऊ (चाकण) प्रसाद अवचट (रावेत) विकास मुर्कुंड(हिंजेवडी) मनाप्पा चव्हाण(हिंजवडी) नवनाथ पवार ( वाकड) सुवर्णा पवार (सांगवी) आणि दिनेश लोखंडे (चिखली) यांचा समावेश आहे. 
      या घटनांचे नेमके कारण स्पष्ट झालेले नसले तरी मानसिक तणाव कौटुंबिक व आर्थिक अडचणी अशा वेगवेगळ्या कारणामुळे त्यांनी टोकाचे पाऊल उचलण्याची शक्यता वर्तवली जात आहे. एकाच दिवशी सात आत्महत्या झाल्याने शहर हादरले असून मानसिक आरोग्याबाबत अधिक जनजागृती आणि समुपदेशनाची गरज व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!