मुंबईत आठवले गटाला धक्का: शेकडो कार्यकर्त्यांचा शिंदे गटात प्रवेश
मुंबईत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) आणि विविध पक्षांच्या शेकडो कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. या प्रवेशामुळे आठवले गटाला मोठा धक्का बसला आहे.प्रवेश सोहळा चुनाभट्टी येथे आयोजित करण्यात आला होता. ज्यामध्ये मंत्री भरत गोगावले उपस्थित होते. या कार्यक्रमात आरपीआय आठवले गटाचे सचिव सुमित वजाळे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला.या प्रवेशामुळे शिंदे गटाची ताकद वाढली असून मुंबईतील राजकीय समीकरणांवर याचा परिणाम होण्याची शक्यता आहे.
