महत्त्वाच्या बातम्या

पुण्यात ठाकरे गटाला मोठा धक्का – माजी आमदार महादेव बाबर शिंदे गटात प्रवेशाच्या तयारीत

     पुण्यात शिवसेनेच्या ठाकरे गटाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार महादेव बाबर हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात बाबर अधिकृतरित्या पक्षप्रवेश करतील, अशी जोरदार चर्चा सुरू आहे.
महादेव बाबर यांनी आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली, त्यामुळे त्यांच्या प्रवेशाची शक्यता अधिक बळावली आहे. बाबर यांच्यासह पुण्यातील काही नगरसेवक आणि स्थानिक नेतेही शिंदे गटात सामील होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

 तिकीट न मिळाल्याने नाराजी

विधानसभा निवडणुकीत तिकीट न मिळाल्याने महादेव बाबर नाराज होते. त्यांच्या समर्थकांनीही याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळेच ते ठाकरे गट सोडण्याच्या तयारीत असल्याची चर्चा अनेक दिवसांपासून सुरू होती.या घडामोडींमुळे पुण्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता असून, ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार आहे. आता बाबर आणि त्यांच्या समर्थकांचा अधिकृत पक्षप्रवेश कधी आणि कसा होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!